शहराची खबरबात - शहराचा चेहरामोहरा बदलू - आ.जगताप

News24सह्याद्री - शहराचा चेहरामोहरा बदलू - आ.जगताप...पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. शहराचा चेहरामोहरा बदलू - आ.जगताप
विकास कामातून शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे गुलमोहर रोड आणि पाईप लाईन च्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल प्रभाग क्रमांक चार मध्ये नगरसेवकांनी प्रभागाच्या विकास कामासाठी विकास आराखडा तयार करून विकास कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावावीत जमिनी अंतर्गत कामे सध्या शहरात सुरू आहेत
2. शिवसेनेला पुन्हा टांग
महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुले यांनी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय या घडामोडींमुळे शिवसेनेला महापालिकेत पुन्हा एकदा एकाकी पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले
3. चोरीच्या एटीएम मधून पैसे काढणाऱ्यास अटक
एटीएम ची चोरी करून त्या एटीएम चा वापर करून पैसे काढणारया आरोपीस अटक करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे
4. कोरोना लसीकरणास ज्येष्ठांकडून अल्प प्रतिसाद
ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची मोहीम सरकारने सुरू केली असली तरी पहिल्या दिवशी जिल्ह्यात 211 ज्येष्ठांनी लस घेतल्याची नोंद आहे.
5. नगरमध्ये उघड्यावरच शिजवले जाते मांस,
महापालिका कायद्याची भीती नागरिकांमधे उरली नसल्यामुळे उघडपणे परवानगी नसतानाही व्यवसाय सुरु आहेत गुलमोहर रोड पारिजात चौक परिसरात रेसिडेन्शिअल परिसर आहे त्या परिसर मध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे.
No comments
Post a Comment