2 मार्च फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - पंकजा मुंडेंची मागणी योग्यच, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. डोंबिवलीत गणेश मंदिरा बाहेर भाविकांच्या रांगा !
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत आहेत. त्याचबरोबर कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत देखील रुग्ण वाढत आहे व आज अंगारकी चतुर्थी असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होणार या कारणाने खबरदारीचा उपाय म्हणून आज डोंबिवली मधील गणेश मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.
2. विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप
शिरपूर तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे त्यानुसार येथील आर सी पटेल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले
3. भाजप आमदाराचं वीजपंपासह विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन
वाढीव वीज बिल आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाजपने विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केलं आहे. भाजप आमदार राम सातपुते तर थेट विधानभवनात कृषी पंप घेऊन आले.
4. नागपूरात भोंदूबाबा आणि त्याची टोळी पोलिसांकडून गजाआड
नागपूरात भोंदूबाबा आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून अंधश्रद्धेच्या बातम्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
5. शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला, हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना टोला
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पत्नी संजना जाधव यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली.
6. "पंकजा मुंडेंची मागणी योग्यच, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा"
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेली मागणी रास्तच आहे.
7. टोमॅटो झाला, आता वांग्यालाही कवडीमोल भाव
गेल्या काही दिवसांत नाशिवंत शेतमालाचे भाव पडत असल्याने नाशिकमधील शेतकऱ्यांवर हताश होण्याची वेळ आली आहे. सध्या बाजारपेठेत कांदा टॉमेटो आणि वांग्याला अक्षरश: कवडीमोल भाव मिळत आहे.
8. इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. जिल्ह्यात येणारा बहुतांश भाजीपाला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून येत आहे.
9. टीआरपी केसमधील मुख्य आरोपी पार्थो दासगुप्ता यांना हायकोर्टाचा दिलासा
कथित टीआरपी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. पार्थो यांना 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.
10. कीटनाशक विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कुचराई
वडगावशेरी येथे करोनाशी सामना करणाऱ्या महापालिका कीटनाशक विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अवघी 150 आहे, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना जादा काम करावे लागत आहे, त्यांच्याकडून 16 तासांपेक्षा अधिक वेळ काम प्रशासनाकडून करून घेतले जात आहे. .
No comments
Post a Comment