कंगनाच्या वाढदिवसानिमित्त थलायवी चा ट्रेलर रिलीज

मुंबई -
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिचा आगामी बहुचर्चित चित्रपट थलायवी आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आज 23 मार्च थलायवी चा ट्रेलर चाहत्यांसमोर सादर करण्यात आला आहे. कंगनाच्या वाढदिवसानिमित्त ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास दाखवण्यात आला आहे. मंगळवारी 23 मार्च रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याची माहिती कंगनाने सोमवारी एका मोशन पोस्टरच्या माध्यमातून दिली होती. तेव्हापासूनच ट्रेलरविषयी उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढत चालली होती. ट्रेलर सुरू होतो ज्यामध्ये पार्श्वभूमीवर एक आवाज ऐकू येतो की, हा चित्रपट आपल्याला राजकारण कसे करावे हे सांगेल. त्यानंतर आपल्याला कंगनाची एक सुंदर झलक पाहायला मिळते. यानंतर कंगनाचे वेगवेगळे सीन दाखवण्यात आले आहेत. यानंतर असे संवाद ऐकू येतात की, ये मर्दों की दुनिया है और हम एक औरत को आगे करके खड़ा है. या दरम्यान जयललिता बनलेल्या कंगनाच्या राजकीय लूकची झलक दिसून येते.
यानंतर जयललिता यांची कंगना रनौत या ट्रेलरमध्ये जोरदार एंट्री आहे. ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनेत्री होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यादरम्यान, कंगनाचा अतिशय सुंदर लूक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. अशाच प्रकारे जयललिता यांचे एमजेआर बरोबरचे वैयक्तिक जीवन देखील अतिशय सुंदर पद्धतीने ट्रेलरमध्ये सादर केले गेले आहे. जयललिता यांनी राजकारणात कसा प्रवेश केला, हे या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दाखवले आहे. ट्रेलरमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची एक झलकदेखील समोर आली आहे. ट्रेलरमध्ये जयललिता यांना शिवीगाळ केल्याची घटनाही दर्शवली आहे. ट्रेलरमध्ये एक जोरदार संवाद आहे- ‘क्योंकि महाभारत का दूसरा नाम है जया आहे.’ 3 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कंगना जयललिता यांचे जीवन अतिशय उत्तम पद्धतीने चित्रपटात सादर करत असल्याचे दिसते.
कथेच्या आणि पात्राच्या मागणीनुसार कंगनाला वजन वाढवावे लागले होते. यावेळी, सर्वात मोठे आव्हान होते की, तिला नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्लीमट्रीम व्हायचे होते. अशा परिस्थितीत कंगनाने खूप कठोर मेहनत केली. खुद्द कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे. तिने लिहिले की, जेव्हा ट्रेलर लाँचिंगसाठी केवळ एक दिवस दूर आहे, तेव्हा मी असे म्हणू शकते की काही महिन्यांत, 20 किलो वजन वाढवणे आणि घटवणे कदाचित सर्वात मोठे आव्हान नव्हते. काही तासांत ही आपली प्रतिक्षा संपणार आहे आणि त्यानंतर जया कायमची तुमची असेल.
No comments
Post a Comment