Breaking News

1/breakingnews/recent

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर 27 रुपये कर, नऊ राज्यांत इंधन स्वस्त, फडणवीसांनी दिली माहिती

No comments



मुंबई -

फडणवीस म्हणतात की इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे. राज्य सरकारने स्वतः पेट्रोल-डिझेलवर 27 रुपये कर लावला आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक पेट्रोल दर असलेल्या राज्यांपैकी एक आहे, असे म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचे गणित मांडून दाखवले. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या  पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर हे गुजरातसह नऊ राज्यांच्या तुलनेत दहा रुपयांनी अधिक आहेत. काही ठिकाणी पेट्रोल पाच-सात रुपयांनी स्वस्त आहे. देशातल्या सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणारा राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे, असा दावा फडणवीसांनी केला.

महाराष्ट्रामध्ये स्वतः पेट्रोल आणि डिझेलवर 27 रुपये कर लावलेला आहे. केंद्र सरकारचा एकूण कर 33 रुपये आहे. त्यामध्ये चार रुपये हे कृषी सेस, तर चार रुपये डीलर कमिशन आहे. उर्वरित पैशांपैकी 42 टक्के पैसे केंद्र सरकार राज्यांना परत करते. राज्य सरकारने मात्र 27 रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावलेला आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. मला असं वाटते की नाना पटोले यांचे आंदोलन हे राज्य सरकारविरोधात असावे. 27 रुपयांचा टॅक्स कमीत कमी करावा किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपयांनी पेट्रोल डिझेल स्वस्त करावं, यासाठी त्यांचं आंदोलन असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. दुसरी शंका अशी आहे, की नाना पटोले फार हुशार आहेत. आता तुमच्या माध्यमात चर्चा चालली होती, की या बजेटमध्ये अजितदादा काहीतरी दोन-तीन रुपयांनी पेट्रोल डिझेलचे कर कमी करणार आहेत. अशा प्रकारचा सायकल मोर्चा काढून त्यांनी ते श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे, असेही फडणवीस म्हणाले. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *