12 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - सत्यजित तांबे यांनी केला राज्य सरकारचा निषेध....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. अहमदनगर - पुणे इंटरसिटी ट्रेन'साठी १३ मार्चला रेल रोको आंदोलन !
अहमदनगर-पुणे इंटरसिटी ट्रेन अहमदनगरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. गेल्या ११ वर्षापासुन अहमदनगर जिल्हा प्रवासी संघ सातत्याने प्रयत्न करुन देखील अजूनही ही ट्रेन सुरु होऊ शकलेली नाही.
2. सत्यजित तांबे यांनी केला राज्य सरकारचा निषेध
.एमपीएससीची परीक्षा अचानक रद्द केल्याने प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.
3. तलाठी भरतीतील ११ डमींवर अखेर गुन्हा दाखल
पावणेदोन वर्षांपूर्वी झालेल्या तलाठी भरतीत बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विश्वासघातकी : राधाकृष्ण विखे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.
5. प्रवरा नदीवरील पुलासाठी सहा कोटी रुपयांचा निधी
संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागातील चिखली- वाडापुर ते निमज दरम्यान प्रवरा नदीवरील पुलासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे आणि इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.
6. गौतम हिरण हत्याकांडात पोलिसांनी केली ३० ते ४० जणांची चौकशी
बेलापूर चे व्यापारी गौतम हिरण यांचे एक मार्चला अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर सात दिवसानंतर वाकडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता.
7. पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अज्ञात आजाराने गुरुवारी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे आणखीन चार जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.
8. विक्रीला बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थावर अन्न औषध प्रशासनाचा छापा
बंदी असतानाही श्रीरामपूर शहरांमध्ये गुटखा,सुगंधित तंबाखू विक्रीचे प्रकार सुरूच असल्याचे निदर्शनात येत असल्याने शहरातील सय्यद बाबा चौक या भागात अन्न सुरक्षा अधिकारी व अन्न औषध प्रशासन विभागाने छापा टाकला आहे.
9. निळवंडे धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सुरू
अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून गुरुवारी 11 मार्च लासंध्याकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून 1500 क्यूसेकने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.जलसंपदाच्या प्राप्त माहितीनुसार प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात येणार आहे.
10. लंपी रोगामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे बाधीत
राहता शहरात गेल्या काही दिवसांपासून जनावरांवरील लंपी या रोगामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे बाधीत झाली असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. जनावराच्या साथीच्या रोगाची तालुका लघु चिकित्सलया कडून गंभीर दखल घेतली असून बाधित जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरु करण्यात आलेत .
No comments
Post a Comment