Breaking News

1/breakingnews/recent

12 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

          News24सह्याद्री - मनसेच्या 'या' बड्या नेत्याला राज ठाकरेंचा धक्का...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही -राहुल गांधींचा 
काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. राहुल गांधी सतत ट्विट करत केंद्रातील मोदी सरकार वर घणाघाती टीका करत असतात. 

2. आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा
वादग्रस्त प्रकरणामुळे मंत्रिपदावरुन गच्छंती झालेल्या संजय राठोड यांची जागा आता मला द्या, अशी मागणी बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. 

3. बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र नसेल तरी इंजिनिअर होता येणार
इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची  बातमी आहे. इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी गणित  आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय बारावीला आवश्यक नाहीत.

4. मनसेच्या 'या' बड्या नेत्याला राज ठाकरेंचा धक्का
राज ठाकरे यांच्या मनसेने जुन्या गोष्टी विसरुन आता नव्याने उभारी घ्यायची ठरवले असले तरी पक्षाचा एकेकाळचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची बाब समोर आली आहे. 

5. फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची सरसंघचालकांशी चर्चा
 विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. 

6. सायबर हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा - वाघेरे
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची तक्रार टेक महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीत सायबर हल्ल्‌याद्वारे अज्ञात व्यक्तीने सर्व्हरमधील डाटा इन्क्रिप्ट करून बिटकॉईनद्वारे पैशाची मागणी केल्याचे म्हटले आहे.

7. पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको,
पुण्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप पाहायला मिळतोय  थोड्याशा विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतली आहे. दररोज हजारच्या वरती रुग्णसंख्या मिळत असल्याने पुण्यात लॉकडाऊनच्या चर्चा सुरु आहेत. 

8. महाशिवरात्रीनिमित्त तुळजाभवानी मातेच्या शिवरूपाचे दर्शन

 महाशिवरात्री दिनी तुळजाभवानी मातेच्या मळवटी महादेवाची पिंड कोरण्यात आली होती. दिवसभरात तुळजाभवानी मातेच्या या शिवरूपाचे तुरळक भाविकांना दर्शन घेता आले.सकाळच्या सामूहिक अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धुपारती करण्यात आली. 


9. मनपा प्रशासकांनी शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी : आमदार बागडे
 शेतकऱ्यांना शेत मालाची विक्री करण्यासाठी मनपा प्रशासकांनी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. 

10. बोरिवलीतील क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरू होणार
बोरिवली पश्चिम येथील चिकूवाडी परिसरातील कित्येक वर्षे रखडलेले प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम येणाऱया दिवसांमध्ये सुरू करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी यावेळी दिले. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *