शहराची खबरबात - राष्ट्रवादी क्रीडा सेलच्या वतीने ३४ खेळाडूंचा गौरव

News24सह्याद्री - राष्ट्रवादी क्रीडा सेलच्या वतीने ३४ खेळाडूंचा गौरव...पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. राष्ट्रवादी क्रीडा सेलच्या वतीने 34 खेळाडूंचा गौरव
राज्यस्तरीय रायफल व पिस्तोल शुटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 34 खेळाडूंचा राष्ट्रवादी क्रीडा सेलच्या वतीने आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
2. पाणी न मिळाल्यास नळ सिमेंट घालून बंद करू
नियमित पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही तक्रार केल्यास पाणी येत नाही तर नळ बंद करून टाका अशी उत्तरे वोंलंम्यान कडून मिळतात महापौर नगरसेवकांकडे तक्रार करूनही पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही
3. तोडगा न निघाल्याने मास्कप्रकरणी कारवाई अद्यापही बंदच
तीन दिवसांपूर्वी सावेडी भागात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू असताना एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत तक्रारही देण्यात आली होती. तसेच याप्रश्नी अद्याप तोडगा न निघाल्याने मनपामार्फत कारवाई बंदच आहे.
4. सर्वांनी मिळून काम केल्यास 5 स्टार मानांकन मिळेल-उपायुक्त यशवंत डांगे
सर्वजण मिळून काम केल्यानंतर 5 स्टार मानांकन मिळेल अशी आशा उपायुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियाना मधील 5 स्टार मानांकन मिळविण्यासाठी उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना विविध उपाय योजनांच्या सुचना केल्या या प्रसंगी ते बोलत होते.
5. आदेशानंतरही बाजार समितीचे प्रवेशद्वार खुले करण्याकडे दुर्लक्ष
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित झाल्याप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे बंद असलेले प्रवेशद्वार खुले करण्याचे पत्र 18 फेब्रुवारीला बाजार समिती सचिवांना दिले होते मात्र तरीही याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
No comments
Post a Comment