नागपुरात वाडीमध्ये भाजपला खिंडार, नगराध्यक्षसह 31पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई -
नागपूर मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.नागपूर जिल्ह्यातील वाडीमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे. वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. सर्व पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहे. भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचे या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. पण यामुळे वाडी नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर असताना, भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप सोडलेले हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.
भारतीय जनता पक्षात अन्यायकारक आणि पक्षपाती कार्यप्रणाली असल्याचा आरोप करत जिल्हा भाजपचे माजी महामंत्री, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडला. याचा वाडीच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजप नेते संजय साडेगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा झेंडा हाती धरला. संजय साडेगावकर हे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आहेत. राठोड यांच्यासह जिल्ह्यातील 50 ते 55 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपला जोरदार धक्के देताना दिसत आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता.
No comments
Post a Comment