Breaking News

1/breakingnews/recent

श्रद्धा माझ्यासाठी देवानं दिलेलं गिफ्ट आहे; शक्ती कपूरने व्यक्त केल्या भावना

No comments



मुंबई -

शक्ती कपूर यांनी व्यक्त केल्या भावना श्रद्धा कपूर सध्या मालदिवमध्ये लग्नासाठी गेली आहे. तिकडे ती धम्माल करताना दिसत आहे. तिने तिचे काही फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले आहे. उद्या म्हणजेच ३ मार्चला तिचा वाढदिवस आहे. तिचे वडील शक्ती कपूर यांनी खास शब्दात तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहे. तिचे वडील शक्ती कपूर तिच्याविषयी बोलताना म्हणाले, “यंदाचं सेलिब्रेशन खूप मोठं असणार आहे कारण यंदा आमचा पूर्ण परिवार एकत्र मालदिवमध्ये श्रद्धाचा वाढदिवस साजरा करणार आहोत. सगळे सोबत आहेत म्हटल्यावर मजा येईल.” असे ते म्हणाले.  तिच्याबद्दल पुढे बोलताना शक्ती कपूर म्हणाले की, “श्रद्धा माणूस म्हणून खूप चांगली आहे. माझ्यात जे गुण नाहीत ते तिच्यात आहे. तिला प्राणी खूप आवडतात. 

मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की आज ती एवढी  यशस्वी अभिनेत्री आहे पण तरीही ती माझे ऐकते, माझं मत विचारात घेते, माझ्याशी कायम अदबीनं वागते. मला माझ्या आयुष्याबद्दल काहीच तक्रार नाही. श्रद्धा माझ्यासाठी देवाने दिलेलं गिफ्ट आहे, ती जणू देवदूतच आहे. लहानपणी ती शाळेतल्या नाटकांमध्ये भाग घ्यायची, तेव्हा मला वाटायचं खरे की ही अभिनेत्री होईल की काय पण शाळेत ती खूप हुशार होती आणि नंतर ती जेव्हा शिक्षणासाठी अमेरिकेला गेली तेव्हा मला वाटलंच नव्हते ती अभिनय क्षेत्रात येईल. पण अचानक एक दिवस मी शूटिंगवरून घरी आलो तेव्हा तिने मला सांगितलं की तिने एक चित्रपट स्वीकारला आहे. श्रद्धा कपूर सध्या आपला मावस भाऊ प्रियांक शर्मा याच्या लग्नासाठी मालदिवमध्ये आहे. प्रियांक हा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आहे. त्यामुळे या वर्षीचा तिचा वाढदिवस तिकडेच, सगळ्या परिवारासोबत होणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *