शहराची खबरबात - सभापती घुले यांनी घेतला पदभार

News24सह्याद्री - सभापती घुले यांनी घेतला पदभार.... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADINES
1. आमदार जगताप यांच्या दूरदृष्टीमुळे शहराची विकासात्मकतेकडे वाटचाल
शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे या अर्थसंकल्पात केडगाव येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण यासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाल्याबद्दल महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे.
2. सभापती घुले यांनी घेतला पदभार
महापालिका स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी आज कार्यभार स्वीकारला यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी नुकतीच निवडणूक झाली यामध्ये राष्ट्रवादी भाजप आघाडीचे अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाली.
3. मिरावली पहाड येथील संदल उरुस स्थगित
कापूरवाडी येथे सोमवारी व मंगळवारी छोटे बाबा दर्गा संदल व उरूस चे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे भाविकांनी संदल व उरूस रद्द झाल्यामुळे आपण मिरावली पहाडावर या दिवशी येऊ नये असे आवाहन दरगा ट्रस्टचे वंशावळ विश्वस्त आसिफ खान पठाण चेअरमन हाजी अन्वर खान यांनी केले आहे
4. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता प्रशासन अलर्ट
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता शहरामध्ये नागरिकांना वारंवार आवाहन करूनही नियमांचे पालन होत नसल्याने जिल्हाअधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पुन्हा कापड बाजारात जाऊन व्यापारी आणि बाजारात आलेल्या ग्राहकांचे प्रबोधन करून सोशल डिस्टन्स पाळणे मास्क वापरणे आणि सॅनिटाइजर चा वापर करण्याचे आवाहन केले.
5. केडगाव शिवसेनेच्या वतीने गरजू महिलांना साड्यांचे वाटप
शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या जयंती निम्मित आज केडगाव शिवसेनेच्या वतीने गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले शिवशेनेचे शहर प्रमुख दिलीप सतपुते नगर सेवक अमोल येवले विजय पाठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्ययात आला.
No comments
Post a Comment