Breaking News

1/breakingnews/recent

२०० कोटी रुपये बजेट असणाऱ्या चित्रपटात आलियाच्या जागी उर्वशी दिसणार

No comments



मुंबई -

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला. ही ती तिच्या सोसिअल मीडिया मूळ उर्वशी तिच्या चित्रपटांसोबतच ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते. आता उर्वशी तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता उर्वशीची निवड करण्यात आल्याचे समोर आले आहे. जोसेफ डी सामी आणि जेराल्ड आरोकीयम यांच्या आगामी चित्रपटात उर्वशी मुख्य भूमिकेत दिसणार असून या तामिळ चित्रपटाचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. 

हा चित्रपट विज्ञानावर आधारित असून तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. उर्वशीने यापूर्वी “काबिल”, “सनम रे”, “भाग जॉनी” यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच उर्वशीने “लव डोस”, “बिजली की तार” आणि “तेरी लोड वे” सारख्या काही म्युजिक अल्बममध्ये काम केले आहे. लवकरच उर्वशी रौतेला ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ती सध्या या सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सीरिजमध्ये उर्वशी अभिनेता रणदीप हूड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. “इंस्पेक्टर अविनाश” ही सीरिज नीरज पाठक दिग्दर्शित करीत आहे. या सीरिजमध्ये पोलीस अधिकारी अविनाश मिश्राची कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच उर्वशी इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान सोबत एका आंतराष्ट्रीय प्रकल्पात काम करणार आहे. दरम्यान उर्वशी “ब्लॅक रोज” आणि “तिरुत्तू पायले 2” च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *