शहराची खबरबात - कत्तलखान्याचे ड्रेनेज पिण्याच्या जलवाहिनीतून घरात

News24सह्याद्री - कत्तलखान्याचे ड्रेनेज पिण्याच्या जलवाहिनीतून घरात...पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. नगर तालुक्यातील हिवरे बाजार गावातील सब स्टेशनच्या पाठीमागे ही घटना घडली.
2. 13 मार्च रेल्वे रोकोच्या जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी मागील एक दशकापासून अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना प्रयत्नशील आहे. शहराच्या सर्वांगीन विकासासाठी महत्त्वाची बनलेली ही रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व माजी खासदार दिलीप गांधी प्रयत्नशील असून, त्यांचे देखील प्रयत्न सुरु आहे.
3. कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटले
ट्रकचे पंक्चर झालेले टायर बदलत असताना दोन मोटारसायकलवर आलेल्या पाच जणांनी ट्रकचालकास गिल्वर व कोयत्याचा धाक दाखवून, त्याच्याकडील १२ हजार ५०० रूपये रोख व फास्टट्रॅककंपनीचे घड्याळ असा ऐवज बळजबरीने काढून नेला.
4. कत्तलखान्याचे ड्रेनेज पिण्याच्या जलवाहिनीतून घरात
शहरातील स्टेशन रस्त्यावरील सीएसआरडीजवळील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमधून सुमारे ५० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून या जलवाहिनीतून मैलमिश्रीत सांडपाणी, तसेच कत्तलखान्यातील लाल पाणी नळातून घरोघर जात आहे.
5. मनपाला महिन्याला 40 लाखांचा दंड
सीना नदीत सोडला जाणार या शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्याने महापालिकेला दर महिन्याला चाळीस लाखांचा दंड आकारला जात आहे गेल्या एप्रिल महिन्यापासून हा दंड लागू करण्यात आल्याने ही रक्कम साडेचार कोटींवर पोहोचली आहे त्याने हलगर्जीपणा केल्याने त्याचा भुर्दंड पालिकेला बसला आहे.
No comments
Post a Comment