12 आमदारांची यादी जाहीर करा, महामंडळ घोषित करु दादा म्हणाले, पोटातलं ओठावर आलं फडणवीस म्हणाले
मुंबई -
महाराष्ट्राचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार आहे. 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे. सरकार अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचे नाटक करतंय. वाढीव वीज बिल प्रश्नी आणि संजय राठोडप्रश्नी उघडं पडण्याची भीती असल्यानं सरकारला अधिवेशनातून पळ काढायचाय असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंमत असेल, तर अविश्वास ठराव आणून दाखवा, असे खुले आव्हान दिले होते. विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, बजेटमध्ये मी तसा निधी देऊ, ज्या दिवशी १२ आमदारांची नावे जाहीर करतील त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु, त्या आमदारांची नावं जाहीर करावी दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाड़ा, विदर्भातले लोक ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही दादांचे पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाड़ा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, फडणवीसांचा हल्लाबोल

No comments
Post a Comment