14 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - जप्त केलेल्या वाहनांचा १७ मार्चला लिलाव....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. बेलपांढरी शिवारात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
नेवासा तालुक्यातील सुरेगाव फाटा-जैनपूर रस्त्यावरील बेलपांढरी शिवारात गारुळे यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड चालू असताना शनिवारी सकाळी ऊसतोड कामगाराला एक कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला.
2. जप्त केलेल्या वाहनांचा १७ मार्चला लिलाव
राहुरी तालुक्यात वाळू चोरी विरोधी पथकांनी प्रवरा व मुळा नदीपात्रातून अवैधरित्या गौण खनिजाचे वाहतूक करताना जप्त केलेल्या ४३ वाहन मालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारित केले आहेत. तरीही अद्याप दंडाची रक्कम भरली नाही.
3. शनिशिंगणापुरात शनिअमावस्येला तुरळक भाविक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथील शनिअमावस्या यात्रा रद्द केल्यानंतरही शनिवारी दिवसभरात तुरळक भाविकांनी हजेरी लावली. देवस्थान ट्रस्ट व पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवत मंदिर परिसरात कुणासही प्रवेश दिला नाही.यात्रा रद्द करूनही तुरळक भाविक आले होते. म
4. तीन बालके कुपोषित बारा जणांचे वजन कमी
शेवगाव येथील डोंगरी वस्ती वरील शाळा भाग या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघाला असतानाच नवा प्रश्न समोर आला आहे.
5. शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजारावर प्रशासनाची टाच
राहाता तालुक्यात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेवून राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी राहाता, शिर्डीसह तालुक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश आज जारी केले.गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी राहाता व शिर्डी नगरपालिका कार्यक्षेत्र, संपुर्ण ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
6. कुख्यात दरोडेखोर यास श्रीगोंद्यात अटक
दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील फरार शंभू कुन्ज्या चव्हाण यास श्रीगोंदे पोलिसांच्या पथकाने येळपणे शिवारातून अटक केली अटक आरोपी विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.
7. मंदिरांसाठी आर्थिक तरतूद करावी वैभव पिचड
अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड रतनवाडी वाघोशी व सोमाटणे येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्ध आहेत सरकारने या मंदिर सुशोभीकरणासाठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केलीये राज्यातील इतर शिवकालीन मंदिरांना सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने निधी देण्याचे ठरविले
8. पुलासाठी सहा कोटींचा निधी
तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांच्या सोयीसाठी चिखली वाडापूर ते निजाम दरम्यान प्रवरा नदीवर नव्याने पूल बांधण्यासाठी सहा कोटींचा निधी मिळाला.
9. टीकाटिपणी करून राजकारण करण्याचे दिवस संपले ऊर्जामंत्री तनपुरे
विरोधकांवर टीकाटिपणी करून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत सध्या नागरिकांचे प्रश्न सोडवावेत लागतात अशी टीका ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत यांच्यावर केली आहे.
10. पाथर्डी विना मास्कधारकांवर दंडात्मक कारवाई
पाथर्डी शहरात प्रांताधिकारी केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली काल पोलीस व पालिका प्रशासनाने बिना मास्क व दुकानात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करत दंडात्मक वसुली केली आहे.
No comments
Post a Comment