शहराची खबरबात - कोरोना नियंत्रणाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर

News24सह्याद्री - कोरोना नियंत्रणाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर.... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. बँक कर्मचाऱ्यांचा उद्यापासून २ दिवस संप
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खाजगीकरण करण्याचे सूतोवाच केले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटना युनाइटेड फोरम ऑफ बँक युनिअन्सने आज आणि उद्या असे दोन दिवस संपाचे आवाहन केले आहे.
2. कोरोना नियंत्रणाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना नियंत्रणाची जबाबदारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी एक आराखडा तयार केला आहे.
3. एमपीएससी परीक्षा 21 मार्चला घेण्याच्या निर्णयाचे अहमदनगर काँग्रेसकडून स्वागत
एमपीएससीने अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देता एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्याच्या केलेल्या घोषणेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता.
4. औषध विक्रेत्यांना कोरोना लस देण्याची मागणी
कृपया जागतिक संकट बनलेल्या कोरूना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पडलेली आहे.
5. न्याय मिळेल याची खात्रीच नाही आता इच्छामरणाची परवानगी द्याच
रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था येतील आर्थिक अपहार आणि फसवणूक प्रकरणी 30 आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे सुप्रसिद्ध चित्रकार तथापि पोलिस संबंधित आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई करत नसल्याने ते उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत.
No comments
Post a Comment