14 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

News24सह्याद्री - आता भारतही कोव्हिशिल्डचे साइड-इफेक्ट्स तपासणार...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भारतात येणार डिजिटल चलन, RBI ने दिले महत्त्वाचे संकेत
भारतात लवकरच भारतीय डिजिटल चलन सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत योजना आखली जात आहे. खुद्द रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीच तसे संकेत दिले आहेत.
2. शोपियानमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा
जम्मू काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यातील रावलपोरा परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली.
3. आता भारतही कोव्हिशिल्डचे साइड-इफेक्ट्स तपासणार
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का कंपनी यांनी विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लशीच्या साइड-इफेक्ट्सच्या अनुषंगाने सखोल अभ्यास करून आढावा घेतला जाणार असल्याचं केंद्र सरकारने शनिवारी जाहीर केलं.
4. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत औरंगाबाद, अहमदनगर महामार्गावर देवगिरी बँके समोर काळ दुपारी झालेल्या आपघातात दुचाकीस्वार निलेश लक्ष्मण सिंग ठाकूर हा ठार झाला आहे. या आपघातात दुचाकीस्वार निलेश हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळी बेशुध्द पडला होता.
5. उल्हासनगरात रिक्षा युनियनच्या नामफलकांंचे उपमहापौरांच्या हस्ते उद्घाटन
उल्हासनगरात रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन आर. पी.आय.चे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष तथा उपमहापौर भगवान भालेराव यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी रिक्षा युनियन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
6. सुनील खमीतकर यांनी अखेर दिले स्पष्टीकरण
नुकतेच लातुरात अनुकंपा नोकरीच्या बदल्यात एक रात्र शरीर सुखाची मागणी केल्याचं वृत्त समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती यावर लातूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी अखेर माध्यम समोर येत मौन सोडले या प्रकरणातील युवती हीच आपल्याला रात्री अकरा वाजल्यानंतर अश्लील मॅसेज करत होती असा आरोप खमीतकर यांनी केला आहे.
7. स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणाचा दहशतवादी संघटनेशी संबंध नाही
मुंबईत स्फोटकांनी भरलेली कार सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएच्या पथकाने अटक करण्यात आली आहे.
8. अमरनाथ यात्रा यंदा २८ जुनपासून
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातली श्री अमरनाथ यात्रा यंदा २८ जुनपासून सुरु होईल. ही यात्रा ५६ दिवस चालेल आणि २२ ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल.
9. मास्क नाकावरून खाली आला तर प्रवासीही विमानातून खाली
देशासह जगभरात कोरोनाने पुन्हा थैमान माजवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान प्रवाशांसाठी कडक नियमावली तयार केली आहे.
10. सचिनचा धमाका, 30 चेंडूत तुफानी अर्धशतक
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात बॅटिंग करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शनिवारी पार पडलेल्या वर्ल्ड सेफ्टी सिरीजच्या इंडिया लिजेंड्स विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केवळ 30 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावलं.
No comments
Post a Comment