11 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - कान्हूर पठारमध्ये भीषण अपघात....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. संगमनेर रस्त्यांसाठी 40 कोटींचा निधी
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरात विकासकामांची घोडदौड अविरत सुरू आहे. त्यांच्या पुढाकारातून तालुक्यातील रस्त्यांच्या मजबूती आणि डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पात 40 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
२. कान्हूर पठारमध्ये भीषण अपघात
कान्हुर पठार मध्ये द्राक्षाने भरलेल्या टेम्पोने थेट बस स्थानक उडवलय.बुधवारी संध्याकाळी झालेल्या अपघातामध्ये राहुल पवार हा जागीच ठार झाला आहे.तर या अपघातात अतुल हा गंभीर जखमी झाला आहे. प्रकाश शिंदे , रंजना पवार हे जखमी झाले आहेत.
3. मालुंजा येथून वाळूवरून हाणामारी
प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतुकीला विरोध करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा येथील उपसरपंचाच्या पतीला वाळूतस्करांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जखमी सखाहरी शेळके यांना उपचारासाठी नगरला हलवण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिला आहे.
4. बिबट्या विहिरीतून सुखरूप बाहेर
राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे कठडे नसलेल्या विहिरीत बिबट्या पडला. हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमाराला शेतकऱ्यांसमोर घडलाय. वन खात्याच्या पथकाने विहिरीत पिंजरा सोडून संध्याकाळी बिबट्याला सुखरूप बाहेर काढलय. कोंढवढ येथे भिमराज म्हसे यांच्या शेतात कठडे नसलेली विहीर आहे.
5. ॲक्टिव्ह रुग्णांचा कोपरगावात शतक
कोपरगाव तालुक्यात कोरॊना बाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज अखेर 118 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तालुक्यातील 50 जणांचे स्त्राव बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते तर पाच जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे.
6. शनिशिंगणापूर येथे मंदिर प्रशासनाची तातडीची बैठक
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या सोनई मधील शनिशिंगणापूर मध्ये शनिवारी 13 मार्चला असलेली शनि अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे .कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता विश्वस्त मंडळ ग्रामपंचायत आणि प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
७. मा. खा. दिलीप गांधी यांची होणार चौकशी
अर्बन बॅंकेच्या मुख्य कार्यालयातून बाजार समिती शाखेत अडीच कोटी रुपयांची चिल्लर मा केल्याचे "रेकॉर्ड' तयार केले. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम तिकडे भरली गेलीच नाही. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने चौकशी सुरू केली आहे.
८. शिर्डीत अघोषित लॉकडाऊनमुळे व्यवसायिकांचे हाल
केवळ शिर्डीच्या साईमंदिरावर अवलंबून असलेल्या शिर्डीच्या बाजारपेठेवर कोरोनामुळे आर्थिक मंदीचे भयानक सावट पसरलं आहे.१७ मार्चला कोरोना लोकडाऊनमुळे शिर्डीचे साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलय.तेव्हापासून शिर्डी नगरी भक्तांविना सुनीसुनी झालीय.
९. गौतम हिरन हत्या प्रकरणात मोठा खुलासा
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरन यांच्या हत्येच्या अनुषंगाने तपासादरम्यान हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचा बनावट माल राहता तालुक्यातील कोल्हार येथील तीन चारी येथे लोणी पोलिसांनी हस्तगत केला आहे. आर टी एजन्सीज या नावाने हे दुकान सुरू होत.
१०. महिला उपसरपंचाला मारहाण
महिला दिनाच्या निमित्ताने जगात महिलांचा सन्मान होत असताना नारायण वाडी येथे मात्र चक्क महिला उपसरपंचाला मारहाण करण्याची घटना घडली आहे. नारायणवाडी येथील उपसरपंच अश्विनी पेठे आणि त्यांचे प्रति प्रमोद पेठे यांना ग्रामपंचायत आवारात मारहाण करण्यात आलीय.
Tags:
No comments
Post a Comment