शहराची खबरबात - शाळेत कोरोना रुग्ण आढळ्यास शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

News24सह्याद्री - शाळेत कोरोना रुग्ण आढळ्यास शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय..पहा शहराची खबरबात मध्ये
1. नगरच्या अमरधाम ची झालीये दूरअवस्था
अमरधाम मध्ये लाईट नसल्याने अक्षरशः गाडीच्या लाईटमध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे मृत्यूनंतरही माणसावर ते संकट संपत नाही असंच काहीसं चित्र नगरच्या अमरधाममध्ये दिसून येत आहे
2. शाळेत कोरोना रुग्ण आढळ्यास शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
ज्या शाळेमध्ये कोरोना बाधित विद्यार्थी सापडतील त्या ठिकाणाचा आढावा घेऊन शाळा तीन दिवस बंद ठेवाव्यात तसेच जिल्हाभरातील सर्व शाळांमधील शिक्षकांना कोरोनाची ची लस देण्यात यावी असा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने पारीत केलाय
3. तलाठी परीक्षेसाठी बनावट कागदपत्रे अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल
जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील 84 पदे भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या भरती व परीक्षा प्रक्रियेत 11 उमेदवारांकडून बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे
4. दोन प्रभागात दहा कोटींची कामे-महापौर वाकळे
मनपाच्या माध्यमातून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत एकेक प्रश्न मार्गी लावून विकासाचा टप्पा पूर्ण करत आहोत तसेच प्रभाग क्रमांक पाच व सहा मध्ये सुमारे 10 कोटी रुपयांची विकासकामे येत्या काळात मार्गी लागणार आहेत
No comments
Post a Comment