Breaking News

1/breakingnews/recent

11 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

         News24सह्याद्री - ९१ वर्षांनंतर गुजरातमध्ये पुन्हा दांडीयात्रा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. 91 वर्षांनंतर गुजरातमध्ये पुन्हा दांडीयात्रा
1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडीयात्रा काढून ब्रिटिश राजवटीला हादरा दिला होता. 91 वर्षानंतर त्या ऐतिहासिक घटनेला पुन्हा उजाळा मिळणार आहे. 

2. स्फोटक प्रकरणामागे भाजपचेच षड्यंत्र ;नाना पटोले यांचा आरोप
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण हेलिपॅडला परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

3. मराठा आरक्षणाला अन्य राज्यांतून समर्थन मिळणार;अशोक चव्हाण यांचा विश्वास
मराठा आरक्षणाबाबत भाजपची राज्यात आणि केंद्रात भूमिका वेगळी आहे. तर प्रसारमाध्यमांसमोर ते तिसरेच काही तरी बोलतात. मराठा आरक्षणासारख्या सामाजिक विषयावर राजकारण करण्याऐवजी त्यांनी केंद्र सरकारला सांगून सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडली पाहिजे. 

4. 'मराठा समाजाला आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या'

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले  आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार उदयनराजे भोसलेंनी अनेकांची भेट घेतली. आता मात्र त्यांनी थेट महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.


5. बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन बंगल्यात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

6. निवडणुकीच्या तोंडावर केरळात काँग्रेसला मोठा झटका
केरळ विधानसभेची निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली असतानाच राज्यातील काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडत असल्याची घोषणा बुधवारी दुपारी केली. 

7. 'स्मार्ट सिटी'च्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह; सायबर हल्ल्यामुळे नामुष्की
 पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सुमारे 400 कोटींहून अधिक खर्च करून कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ते सुरू करण्यात येणार आहे.मात्र त्यापूर्वीच कमांड अँड कंट्रोल सेंटरवर सायबर हल्ला झाला आहे.

8. आम्हाला बेरोजगार करू नका; आयटी कंपनीसमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
आयटी पार्क, हिंजवडीमधील टाटा टेक्‍नोलॉजी या कंपनीसमोर नॅशनल इन्फोर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

9. माझ्याकडे कागदपत्रे कशी आली याची चौकशी करा!
मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात माझ्याकडची कागदपत्रे मी सरकारकडे पाठवणारच आहे. त्याचा पाठपुरावादेखील करणार आहे. 

10. क्रीडा संघटक नथुराम पाटील यांचे निधन

शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ संघटक नथुराम पाटील यांचे 10 मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. निधनासमयी ते 83 वर्षांचे होते.  रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या स्थापनेपासून नथुराम पाटील त्या संघटनेचे प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत होते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *