25 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - नाना पटोलेंनंतर कोण होणार विधानसभा अध्यक्ष?....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. चाळीस लाख ट्रॅक्टर शेतकरी आंदोलनाशी जोडणार
केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत अन्यथा दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असं राकेश टिकेत यांनी सांगितलंय.
2. संजय राठोड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची आज बैठक पार पडली. यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वनमंत्री संजय राठोडही उपस्थित होते. परंतु, कॅबिनेटच्या बैठकीत संजय राठोड प्रकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही,.
3. नाना पटोलेंनंतर कोण होणार विधानसभा अध्यक्ष?
आज विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक मुंबई विधान भवन याठिकाणी होणार आहे. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक यावर निर्णय होणार आहे.
4. पुणे :बजेट ओलांडणार आठ हजार कोटींचा टप्पा
महापालिका स्थायी समितीचे 2021-22 या आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक 1 मार्च रोजी सादर होणार आहे. समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे अंदाजपत्रक सादर करतील.
5. हर्षवर्धन जाधव यांच्या अटकेची शक्यता
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा गैरवर्तन केल्याचा सरकारी वकिलाने आरोप केला आहे.
6. आधार लिंक नसलेल्यांचे रेशन मार्चपासून होणार बंद
रेशनमधील काळाबाजार बंद करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्राहकाचे रेशनकार्ड आधार क्रमांकाला जोडणे बंधनकारक केले होते. त्याची मुदतही १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती.
7. राज्यपालांना आमदारांची नियुक्ती करावी लागणारच
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विधानपरिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी आता ठाकरे सरकारकडून नव्या मार्गाचा वापर केला जाणार आहे.
8. सहा मंगलकार्यालयं महापालिका प्रशासनाकडून सील
जळगाव शहरातील एकूण सहा मंगलकार्यालयं प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. वारंवार सूचना देऊनही मंगलकार्यालयात गर्दी दिसून येत असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मात्र ज्यांची लग्न या कार्यालयात करायचं ठरलं होतं, त्यांच्यासाठी आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
9. भातगिरणी मालकाला 80 कोटींचं बिल; महावितरणाकडून चुकीची दुरुस्ती
वसईत एका भात गिरणी मालकाला दोन महिन्यांच तब्बल 80 कोटी वीजबिल एकच खळबळ उडाली होती. एवढ्या प्रचंड रकमेचं बिल हाती येताच गिरणी मालकाला चांगलाच धक्का बसला होता. मात्र महावितरणाने आपल्या चुकीची दुरुस्ती करून गिरणीमालकाला घरपोच सुधारित बिल दिले आहे.
10. 'नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी रंग बदलणार नाही
इंग्लंडचा भारत दौरा चालू असून आज पासून या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना चालू आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुलाबी चेंडूने हा सामना खेळवला जात आहे. तत्पुर्वी चेन्नईत झालेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यात खेळपट्टीमुळे बराच विवाद निर्माण झाला होता.
No comments
Post a Comment