Breaking News

1/breakingnews/recent

लाज वाटली पाहिजे तुम्हाल; चित्रा वाघ पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या संताप व्यक्त केला

No comments



मुंबई -

चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन भाजपा प्रचंड आक्रमक झाली असून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात घटनास्थळी भेट दिली आहे. पूजा चव्हाण ज्या इमारतीत राहत होती, जिथे तिने आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आली असल्याचे सांगितले. यामुळे त्यांनी इमारतीमधील दुसऱ्या घरात जाऊन गॅलरीची उंची तसंच इतर गोष्टींची पाहणी केली आहे. यानंतर चित्रा वाघ वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. मात्र यावेळी त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट पोलिसांसमोरच तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्या म्हणाल्या की लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत टीका त्यांनी केली. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहे. लेखी परवानगी नाही असे सांगत आहे. जी दोन मुले प्रत्यक्षदर्शी होती त्यांना तर सोडून दिले. 

हे प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. लाज वाटली पाहिजे यांना अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला. पोलीस रक्षक आहेत की भक्षक आहेत अशी विचारणा करताना चित्रा वाघ यांनी नक्कीच यांच्यावर दबाव आहे असा आरोप केला. पोलीस आमच्याकडे तक्रार नाही असे सांगत आहे. पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. यांच्याकडून तपास काढून घेतला पाहिजे. ते राजकीय दबाबाखाली काम करत आहे. मी माझ्या २२ ते २४ वर्षाच्या समाजकारणात हे पाहिलेले नाही असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. सुओ मोटो अंतर्गत तक्रार का दाखल केली नाही असे मी विचारले असता लेखी परवानगी नसल्याचं सांगत आहेत. कोणाची चाकरी करत आहात ? आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही असं ते वागत आहेत. नक्की कोणाची परवानगी हवी आहे हे स्पष्ट करावं अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *