25 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - पोलिसांना पाहताच चोरट्यांचे पलायन....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. शाळेच्या मैदानाचे कचरा डेपोत रूपांतर
नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील खडकी येथील नगर परिषद शाळा क्रमांक 19 च्या मैदानावर परिसरातील नागरिक कचरा टाकीत असल्याने या मैदानाचे कचरा डेपोत रूपांतर झाला आहे.
2. मुंबई रेल्वे गाड्यांची पर्यटनाकरिता आवश्यकता
नगर जिल्ह्याचे भविष्यातील वाढते औद्योगिकरण व धार्मिक पर्यटन क्षेत्रातील वाव लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबई करीता अधिकाअधिक रेल्वेगाड्या सुरू कराव्या अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
3. श्रीगोंदा कोरोणाची दुसरी लाट
श्रीगोंदा नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आला आहे.
4. पाचेगाव पाणी योजना न्यायालयीन वादात.
पाचेगाव नेवासा तालुक्यातील पाचेगाव पालन योजनेच्या टेंडर प्रक्रियेचा घोटाळा उघडकीस आला होता. यानंतर जिल्हा परिषदेतील चौकशी समितीने अहवाल सादर केला होता.
5. कोपरगावात कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार
कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली होती. त्यामुळे कोपरगाव येथील कोवीड केअर सेंटर हे 12 फेब्रुवारीला बंद करण्यात आला होता.
6. मजुरांअभावी कापुस उन्हात तळपतोय
रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीसह मशागतीची कामे सुरू आहेत. खरीप प्रमाणे हातातोंडाशी आलेली ही रब्बी पिके ही अस्मानी संकटात सापडू नयेत यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहेत.
7. 104 जणांवर दंडात्मक कारवाई
तालुक्यातील ग्रामीण भागात तालुका पोलिसांनी मंगळवारी व विना मास पेरणी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पाळणाऱ्या 104 जरा विरुद्ध दंडात्मक कारवाई करून दहा हजार आठशे रुपयाची कारवाई कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे
8. पोलिसांना पाहताच चोरट्यांचे पलायन
मानपाडा येथून चोरट्यांनी एक स्कूल बस चोरून आणली. ही बस नगर औरंगाबाद रोडने घेऊन चालले होते. दरम्यान नेवासा फाटा जवळ अचानक पोलीस समोर दिसल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात स्कूल बस चोरीची फिर्याद दाखल होती.
9. पाच लाखांसाठी महिलेचा छळ
कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे. यासाठी विवाहितेचा तिच्या सासरी वैजापूर येथे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणवीस या कालावधीत वारंवार शिवीगाळ मारहाण आणि दमदाटी करून उपाशीपोटी ठेवून घराबाहेर काढून छळ केल्याची घटना समोर आली आहे.
10. तीन अट्टल आरोपींना सिन्नर मध्ये पकडलं
शहर पोलीस हद्दीतील मोटारीचे शोरूम व अकोले तालुक्यातील चोरीप्रकरणी तांत्रिक तपासाच्या आधारित सिन्नर तालुक्यातील तीन अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे त्यांच्याकडून एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment