24 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - सावेर शिवारातुन आठ लाखाचा बनावट दारूसाठा जप्त....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. शिवसेनेने भाजपा व राज्यपालांवर डागले टीकेचे बाण
राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाल्याचा दावा करत शिवसेनेनं महाराष्ट्रातील भाजपा नेते व राज्यपालांवर टीकेचे बाण डागले आहेत.
2. हुगळीमधील मैदानावर शिंपडण्यात आलं गंगाजल
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भारतीय जतना पार्टी असा थेट राजकीय संघर्ष होणार आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलच तापलं आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हुगळीमध्ये एका प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेमध्ये दिलेल्या भाषणात मोदींनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.
3. गुजरात महानगरपालिका निवडणुकीतील पराभवानं काँग्रेस भडकलं
सूरत महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं दमदार यश मिळवलं आहे. एकूण 120 जागांपैकी 93 जागांवर भाजपनं आपला झेंडा फडकवला आहे.
4. सावेर शिवारातुन आठ लाखाचा बनावट दारूसाठा जप्त
शिरपूर चोपडा रोड वरील सावेर शिवारातुन सुमारे आठ लाखाच्या बनावट दारूच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलाय भिका गंगाराम भिल यांच्या शेतात असलेल्या झोपडीत चार संशयित कुठलाही परवाना नसतानाही स्पिरिट खरेदी-विक्री,साठा,वाहतूक बेकायदेशीररित्या मानवी आरोग्यास हानिकारक असलेली बनावट दारूचे पाच सीलबंद बॉक्स, रिकाम्या बाटल्या, स्पिरिटचे ड्रम सह आदी साहित्य आढळून आले.
5. पामेला गोस्वामी प्रकरणात भाजपा नेत्यासह दोन्ही मुलांना अटक
पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात कोलकाता पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपा नेते राकेश सिंह यांना अटक केली आहे.
6. पोलीस कार्यालयात 50 टक्के हजेरी
कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याच्या शक्यतेमुळे पोलीस कार्यालय 50 टक्के हजेरीवर सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
7. मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्यामुळे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनला पुन्हा ब्रेक लागण्याची चर्चा सुरु झाली आहे.
8. शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवा
गेली वर्षभर कोरोनाने सगळ्या जगाला हैरान केलं. कित्येक महिने तर कोरोनाच्या धास्तीने लॉकडाऊन केलं गेलं. काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात येतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र आता नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे.
9. आठशे जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुढे ढकलला
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आठशे जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.
10. परिस्थिती बिघडली तर मुंबईत पुन्हा लॉकडाउन
करोना साथ आटोक्यात आल्यानं मुंबईतील जनजीवनानं पुन्हा गती घेतली होती. मात्र, पुन्हा एकदा करोनामुळे ब्रेक लागण्याची भीती दिसू लागली आहे. फेब्रुवारीपासून मुंबईत करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढला असून, आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
No comments
Post a Comment