Breaking News

1/breakingnews/recent

24 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

    News24सह्याद्री -  नगर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार घोषित....पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये 




TOP HEADLINES


1. नगर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार घोषित  (स्टॉक )
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या समृद्ध अशा अहमदनगर जिल्ह्याच्या कामगिरीमध्ये एक मानाचा तुरा आता रोवला जाणार आहे. नुकतेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्ह्याला भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. 

2. लोणी पोलीसांची धडाकेबाज कामगिरी 
लोणी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक समाधान पाटील यांना गुप्तहेरांमार्फत माहिती मिळाली की, श्रीरामपूर भागातील गलनिंब शिवारातून तेजस  मोरे हा व्यक्ती  विनापरवाना वाळू चोरून वाहतूक करताे. 

3. अहमदनगर जिल्ह्याला कोरोनाचा वाढता विळखा 
अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. सोमवारी 187 तर मंगळवारी 159 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय.  सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या 899 किती झाली आहे. 
 
4. डिग्रस फाटा येथे चारचाकी वाहनाची  मोटारसायकल ला जोरदार धडक  
राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे चारचाकी वाहनाने मोटारसायकल ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पाथर्डी तालुक्यातील मोटारसायकल चालक ठार झाल्याची घटना दिनांक २२ फेब्रुवारीला  घडलीय . 

5. जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 
तिरट  नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातुन  69 हजार 240 रुपये हस्तगत करून तीन जणांना ताब्यात घेण्यात आल आहे मात्र चौघेजण तिथून पसार झालेत. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

6. अहमदनगर जिल्ह्यातील ६ जणांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती 
राज्य पोलिस दलातील 438 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे , यामध्ये विशेष बाब म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील सहा जणांचा यामध्ये समावेश आहे. 

7. जामखेडमध्ये मतदार यादीवर २०६७ हरकती
जामखेड नगर परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर २ हजार ६७ हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रशासक जयश्री माळी यांनी या हरकती निपटण्यासाठी चार जणांची समिती नियुक्त केली आहे. त्याचा चार दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे.


8. शनिशिंगणापुरात व्यवसायिकांना धंदा बंद पडण्याची भीती. 

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्यात पुन्हा एकदा लोकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्यानंतरही नियम धाब्यावर बसवून अनेक भाविक शनी दर्शनासाठी  शनी शिंगणापूरमध्ये येत आहेत. तिथल्या नागरिकांना ही कोरोनाची धास्ती  नसल्याचे दिसून आलं आहे.


9. साईभक्तांसाठी नियमावली जाहीर (स्टोक )

कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानाच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. 


10. राहुरी फॅक्टरी गुन्हगारांचे केंद्र 

राहुरी फॅक्टरी परिसर मागील काही वर्षांपासून गुन्हेगाराचा केंद्र बनला आहे. विशेषता नगर-मनमाड महामार्गावरील ताहाराबाद श्रीरामपूर चौक गुन्हेगारांचा अड्डा झालाय. अवैध धंदे, गावठी पिस्तूल,  चोऱ्या ,रस्ता लूट करणारे गुन्हेगार यांचे  चौकामध्ये कायम वास्तव्य असते. 






 







No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *