10 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - ट्विटरकडून ७०२ अकाउंट्स बंद....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. रोहित पवारांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक
.एरवी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या निर्णयांमधील त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी नरेंद्र मोदीयांचे कौतुक केले.
.एरवी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या निर्णयांमधील त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी नरेंद्र मोदीयांचे कौतुक केले.
2. औषधांवरील साडेसहा कोटींचा कर माफ
मुंबईतील एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक औषधी अमेरिकेतून आयात करण्यासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहेत.
3. दारु माफियाचा पोलिसांवर हल्ला
उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात काल रात्री दारु माफियाने पोलिसांवर हल्ला केला. यात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर पोलीस उपनिरीक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
4. ट्विटरकडून ७०२ अकाउंट्स बंद
द्वेष पसरवणारी ठाराविक ट्विटर अकाउंट्स बंद करण्याचे केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतरही त्यावर कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटर इंडियाला सरकारने झटका दिला आहे.
5. वर्सोवा परिसरात भीषण आग
शहरातील वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली लागल्याची घटना घडली. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथील एका गोदामाला आग लागली आहे.
6. असीम सरोदेंची ED ला नोटीस!
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (ED) दिग्गजांना नोटीस पाठवल्याच्या घटना सध्या समोर येत आहेत. मात्र अशातच वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी चक्क ईडीलाच नोटीस पाठवली आहे.
7. ‘खारं पाणी गोडं करण्याचा प्रस्ताव म्हणजे विरप्पन गँगचा नवा लुटीचा मार्ग
समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा प्रस्ताव म्हणजे विरप्पन गँगचा नवा लुटीचा मार्ग आहे, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर बाण सोडला आहे. खारं पाणी गोड करण्याच्या प्रस्तावाला मनसेचा विरोध असल्याचं देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.
8. अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं जोरदार भाषण राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत ठोकलं.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं जोरदार भाषण राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत ठोकलं.
9. एकनाथ शिंदेंना हायकोर्टाचा दणका
राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. मिरा भाईंदर महानगपालिकेत शिवसेनेच्या एका नामनिर्देशित नगरसेवकाची नियुक्ती रद्द केली.
राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. मिरा भाईंदर महानगपालिकेत शिवसेनेच्या एका नामनिर्देशित नगरसेवकाची नियुक्ती रद्द केली.
No comments
Post a Comment