10 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - लाच प्रकरणी 'महिला तलाठी' एसीबीच्या जाळ्यात!...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. लाच प्रकरणी 'महिला तलाठी' एसीबीच्या जाळ्यात!
६ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे.तक्रारदार यांच्या खडकेवाके हद्दीतील वडिलांची व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोडपत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे.
2. खुनाचा प्रकार कुत्र्यामुळे उघड
तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील माळरानावर काल काही कुत्र्यांनी जमिनीत पुरलेला पुरुषाचा मृतदेह करून काढला हा प्रकार या परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
3. राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथे रवला राष्ट्रवादीचा झेंडा
खडांबे बुद्रुक येथे कैलास दिलीप पवार यांची सरपंच पदी तर विजया बाबासाहेब लांडगे यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. सरपंच उपसरपंच पद हे बिनविरोध निवडून आलेले असून गावामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
4. रस्त्यावरील सुरक्षितता सर्वांची जबाबदारी
रस्त्यावरून प्रवास करताना प्रत्येक वाहन धारकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे प्रतिपादन महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक शशिकांत गिरी यांनी केले
5. महावितरणाच्या योजनेस राहुरी करांचा मोठा प्रतिसाद
राज्य सरकारच्या नवीन कृषी पंप विज धोरणानुसार विज बिल वरील दंड व्याजमाफी सह 50 टक्के सवलत योजनेस काल माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला तनपुरे म्हणाले की नवीन कृषी विषयक धोरणा नुसार वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पाच वर्षांपूर्वीचे सर्व व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
6. राणेगाव ला नवीन रोहित्र जोडून मिळावे.
राणेगाव येथील टोनपे वस्तीवर शेतकऱ्यांना नवीन शंभर टक्के वीज रोहित्र तात्काळ देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरविंद कुकडे यांच्याकडे केली.
7. अशोक से तीन लाख 85 हजार टन गाळप
अशोक साखर कारखान्याचे आज अखेर 3 लाख 85 हजार टन उसाचे गाळप केले गेले आहे. 70 हजार टन ऊस बाहेरील कारखान्यांना पुरविल्या असल्याची माहिती अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ यांनी दिली आहे. संगमनेरशी एक लाख टन आणि प्रवरा कारखान्याची दिड लाख टन पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांचा ऊस गाळपा विना राहणार नाही असेही कहांडळ यांनी स्पष्ट केल आहे.
8. ग्राम पंचायत करणार गावातील वीज बिलाची वसुली
वीज बिलाची वसुलीचे मोठे आव्हान महावितरण समोर आहे कृषी आणि ग्रामीण भागातील विज बिल वसुलीसाठी ग्रामपंचायतींना वसुलीचे अधिकार देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.
9. पाझर तलावासाठी पाणी मिळणार
तालुक्यातील पूर्व भागातील उक्कडगाव येथील पाझर तलाव हा पालखेड कालव्याच्या सुरू असलेल्या आवर्तनातून भरून द्यावा अशी मागणी केली होती
10. कामाची चौकशी करण्याची मागणी
पुणतांबा रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायत ने वर्ष 2019 20 14 व्या वित्त आयोग अंतर्गत केलेल्या कामाची चौकशी करण्याची तक्रार मुख्याधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद अहमदनगर व गट विकास अधिकारी पंचायत समिती राहता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
No comments
Post a Comment