पराभवानंतर विराट कोहलीनं इंग्लंड संघाला पुढील सामन्याासाठी दिला इशारा
मुंबई -
इंग्लंड सांग पराभवानंतर विराट कोहली याने इंग्लंडचं कौतुक करत त्यांना इशारा दिला पाहुण्या इंग्लंड संघाने चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा २२७ धावांनी पराभव करत दौऱ्याला दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीने इंग्लंड संघाचे कौतुक करतानाच पुढील सामन्याासाठी इशाराही दिला आहे. सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, ‘आम्हाला पुनरागमन करायला येत. पुढील सामन्यात आम्ही सर्वस्वी झोकून देऊन आमचे बेस्ट देऊ. पहिल्या सामन्यात झालेल्या चुका आम्ही सुधारु. पुढील सामन्यात मोठ्या भागीदाऱ्या करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
पुढील सामन्यात सकारात्मकतेने सुरुवात करावी लागेल. तसेच इंग्लंडच्या संघावर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करावा लागेल.असे विराट कोहली म्हणाला ५७८ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात निराशाजनक फलंदाजीमुळे सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्णाण करण्यातही आम्हाला अपयश आले. फलंदाजाच्या खराब कामगिरीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. आमच्या एका फलंदाजाने जरी शतक केले असते, तरी आम्हाला झुंज देण्याची संधी निर्माण झाली असती. मात्र, पहिल्या डावात इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली आणि याचा आम्हाला फटका बसला, असे कोहली म्हणाला आहे.

No comments
Post a Comment