Breaking News

1/breakingnews/recent

१ फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

    News24सह्याद्री - सरकारने इंटरनेट बंद केलं, शेतकऱ्यांनी लाऊडस्पीकरवरुन काम केलं फत्ते....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. यंदाचा बजेट मेड इन इंडिया टॅबमधून 
अवघ्या तासाभरात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्र सरकारने पेपरलेस कारभार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प सादर होणार आहे.

2. सरकारने इंटरनेट बंद केलं, शेतकऱ्यांनी लाऊडस्पीकरवरुन काम फत्ते केलं 
 राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांचं शांततेत आंदोलन सुरु आहे. मात्र, प्रजासत्ताकदिनी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

3. न्यायदानात महाराष्ट्र देशात एक नंबर, इंडिया जस्टीसचा अहवाल जाहीर
न्याय मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱया बहुसंख्य नागरिकांना न्यायदेवतेकडून दिलासा मिळत असून न्यायदानात देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने एक नंबर पटकावला आहे.

4. नेटफ्लिक्स, हॉटस्टारसह सर्व ओटीटीसाठी लवकरच नियमावली
मिर्झापूर, तांडवर यांसारख्या वेब सिरिजविषयी आलेल्या तक्रारीनंतर सरकारने गंभीर पावले उचलली आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित आल्यानंतर आता त्यांच्यासाठी लवकरच नियमावली ठरविण्यात येणार आहे.

5. भालचंद्र मुणगेकर यांची  मोदी सरकारवर केली आहे.  
पुढील वर्षी राष्ट्रीय उत्पन्न 11 टक्‍क्‍यांनी वाढ होईल असा दावा केला जात आहे. हा असा दावा कशाच्या आधारे केला जात आहे. देशातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. केवळ घोषणांवर देश चालविण्याचा प्रयत्न केला जात आहेत, अशी टीका अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मोदी सरकारवर केली आहे.

6. मराठी साहित्य संमेलनस्थळाचे 'कुसुमाग्रज नगरी' नामकरण
नाशिकमध्ये होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळाचे नामकरण 'कुसुमाग्रज नगरी' असे करण्यात आले आहे, असे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज जाहीर केले.

7. दीक्षान्त समारंभ होणार ऑनलाईन
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज १ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या दीक्षान्त समारंभात विविध विद्याशाखांमधील 1 लाख 91 हजार 495 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. 

8. अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करा
कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. 

9. छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली भावना
 छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला. 

10. महाराष्ट्रात रंगणार आयपीएलच्या सर्वाधिक लढती
कोरोनाचे संकट आटोक्यात आल्याने 'आयपीएल'चा 14 वा हंगाम मायदेशात घेण्यासाठी 'बीसीसीआय'ने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. यात महाराष्ट्राच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक खूशखबर आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *