Breaking News

1/breakingnews/recent

१ फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

             News24सह्याद्री - दुहेरी हत्याकांडाचा तपास लावण्यात शेवगाव पोलिसांना यश....पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये 




TOP HEADLINES

1. एस्केप योजनेचा होणार पारनेर ला लाभ
पारनेर व शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील अडीच हजार हेक्‍टर क्षेत्राला 'एस्केप ' योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगतानाच पारनेर तालुक्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली . 

2. दुहेरी हत्याकांडाचा तपास लावण्यात शेवगाव पोलिसांना यश  
शेवगाव शहरात उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले
हे हत्याकांड आर्थिक देवाण घेवणीतून झाले असून मयत व मारेकरी दोन्हीही एकमेकांचे नातेवाईक असून मुळ 

3. पारनेर शेतातून जाऊ देत नसल्याने मारहाण
शेतातून जाऊ देत नसल्याच्या रागातून काल सकाळी महिलांसह तिघांना मारहाण केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय संदीप बाळू धुमाळ किरण बाळू धुमाळ बाळू धुमाळ व शालुबाई धुमाळ अशी त्यांची नावे आहेत

4. तब्बल दहा लाखांची विदेशी दारू जप्त!
राज्य उत्पादन शुल्क, नगर व बीड यांनी संयुक्त मोहिम राबवून पाथर्डी तालुक्यातील वडगाव शिवारात सुमारे पाच लाख रूपये किंमतीचा देशी- विदेशी दारूचा साठा व एक पिकअप वाहन असा १० लाख १७ हजार ७८४ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

5. मागील भांडणाच्या कारणावरून ऊस पेटवला
भांडणाच्या कारणावरुन तिघा जणांनी पाच एकर ऊस जाळण्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे घडला आहे.याबाबत मंदा ज्ञानदेव विखे यांच्या  फिर्याद दिलीये.

6. साईबाबा संस्थानकडून पत्रकारांवर गुन्हा दाखल
साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्या पासूनच स्थानिक गावकरी आणि प्रसारमाध्यमांशी ‘पंगा’ घेवून मनमानी भूमिका घेणाऱ्या कान्हुराज बगाटे यांनी आज आपला खरा रंग दाखवला..

7. खंडोबा व माळसादेवी यांचा दैवी विवाह सोहळा संपन्न  
परंपरेप्रमाणे येथे पौष पौर्णिमेच्या दिवशी खंडोबा व माळसादेवी यांचा दैवी विवाह सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

8. कर्जत पोलिसांचा दारू अड्ड्यावर छापा
 कर्जत तालुक्यातील कोरेगावनजीक सटवाई फाटा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून दारुचा साठा जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.

9. ऊर्जामंत्री महावितरण अधिकार्‍यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा
कोरोना  काळातील वीज बिल माफ करू असे सांगून तसे करणाऱ्या ऊर्जामंत्री महावितरण अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशा मागणीचे निवेदन नेवासा येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी येथील पोलिस निरीक्षकांना दिले याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष  प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

10. साईसंस्थांचा कर्मचाऱ्यांना इशारा
शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरात व्हीआयपी किंवा सेलिब्रिटी आल्यानंतर काही कर्मचारी या लोकांच्या मागे मागे फिरताना दिसतात.त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होते. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *