जिल्ह्याची खबरबात - शेवगाव शहरात शाळा सुरू होताच वाहतूक कोंडी वाढली
News24सह्याद्री - शेवगाव शहरात शाळा सुरू होताच वाहतूक कोंडी वाढली...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
शेवगाव शहरातील शाळा सुरू होताच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली. मिरी रोडला अनेक वेळा अपघात झालेले आहेत.
2. वाहतुकीचे नियम पळून अपघात टाळा - दीपक पाटील
सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे.
सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे.
3. परमसद्गुरु शुक्राचार्य पालखी मार्ग नामकरणाची मागणी
कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावरील बेटात शुक्राचार्य मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गास परमसद्गुरु शुक्राचार्य पालखी मार्ग असे नाव देण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात आलीये.
4. जनजागृती साठी वाहनांना रस्ता अभियानाचे स्टिकर
आज लोणी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक महाराष्ट्र सुरक्षा पथक विजय तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील वाहनचालकांना रहदारी विषयी माहिती देण्यात आली.
5. श्रीगोंदा येथे इंधन दरवाढ विरोधात उपहासात्मक आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्या मार्गदर्शनात तसेच अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या नेतृत्वात पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले.
6. पराभूत झालेल्या उमेदवारांचा नागरी सत्कार
निवडणूक कोणतीही असो, विजयी झालेल्यांची मिरवणूक काढतात, सत्कार केले जातात. पराभूत झालेल्यांवर तोंड लपून बसण्याची वेळ येते.
7. बिबट्यांचे मृत्यू टाळण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार
महामार्गावर बिबट्यांचे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
8. डिजिटल पाणी आंदोलनाच्या निमित्ताने कोपरगावचा पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्नावर आतापर्यंत अनेक वाद-प्रतिवाद झाले. परंतु हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आजही कोपरगावकरांना आठवड्यातून एकदा पाणी मिळते.
9. विखेंविरोधात स्थानिक भाजप नेते एकवटले
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी पक्षविरोधी काम केल्याची तक्रार केली होती.
10. नेवासे ३.५ कोटी खर्चाच्या विविधविकासकामांचे भूमिपूजन
नेवासे नगरपंचायत अंतर्गत शहरातील सुमारे ३ कोटी ५० लाख खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
नेवासे नगरपंचायत अंतर्गत शहरातील सुमारे ३ कोटी ५० लाख खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
No comments
Post a Comment