Breaking News

1/breakingnews/recent

28 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

   News24सह्याद्री - वाळू लिलावाला विरोध केल्याने ग्रामस्थांच्या थोबाडीत भडकावली....पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये 




TOP HEADLINS


1. राष्ट्रीय महामार्गासाठी ३५ कोटी ४२ लाखांचा निधी
नगर जिल्‍ह्याच्‍या दळणवळणाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण असलेल्‍या कल्याण, अहमदनगर, नांदेड या राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या कामासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रयत्‍नांमुळे ३५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. \
२. नगराध्यक्ष व पक्षात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी 
कोपरगाव शहरातील रस्त्याच्या निघालेल्या निविदेवरून मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात चांगलाच कलगी तुरा रंगला असून  अनेक आरोप प्रत्यारोप देखील  झालेत. 

3. पोलीस व नगरपरिषदेची धडाकेबाज मोहीम 
राहुरी शहरात रस्त्यावर लागणारी छोटी मोठी दुकाने, हातगाड्या यांच्यामुळे नेहमीच वाहतूकीला अडथळा निर्माण होतो.

४. गावठी कट्ट्यांसह ३ जणांना रंगेहाथ पकडले
अवैधरित्या गाठी कट्टा ,२ जिवंत काडतुसे, चोरीची काळ्या रंगाची बुलेट बाळगणाऱ्या तिघांना शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी रंगेहाथ पकडलंय. कृष्णा गुंड, नवाज सय्यद, विकास खरपुडे अशी आरोपींची नावे असून त्यांना मुद्देमालासहित ताब्यात घेण्यात आलय.

५. नगर - मनमाड रस्त्याप्रश्नी विद्यार्थ्यांचे आंदोलन
शिर्डी आणि कोपरगाव महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या असंख्य अपघात टळावे आणि महामार्गावरील खड्यासंदर्भात प्रशासनाला जाग आणण्या साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येत सावळीविहीर फाटा इथे एकत्र येत महारमार्गावर उतरत आंदोलन केलय.

६. तरुणाचा कॅनॉलच्या  पाण्यात बुडून मृत्यू
राहता तालुक्यातील टिळकनगर येथील सिद्धार्थ बाळू सुतार या तरुणाचा पाठ कॅनॉलच्या  पाण्यात बुडून मृत्यू झालाय.  नादर्न  ब्रांच इथे सिद्धार्थचा  मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आलाय. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॅनॉलच्या पाण्याची पातळी अत्यंत खालावली असून अवघे गुडघ्याइतके पाणी तिथे आहे. 

7. खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पसारा आरोपीला पोलिसांनी केलं गजाआड
एकावर प्राणघातक हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अडीच वर्षांपासून पसार आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.  याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

8. जिल्हा बँकेसाठी कर्जत-जामखेडमध्ये सर्जिकल स्ट्रा‌इक 
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचा विजय सर्जिकल स्ट्राइक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा दीड वर्षांनी निघाला. दीड वर्षात मतदारसंघात दीड रुपयांचे कामही केले नाही, 


9. पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल रॅली 

कर्जतमध्ये सामाजिक संघटनांच्या वतीने कर्जत ते पैठण अशी पर्यावरणजनजागृती करणारी पर्यावरण सायकल रॅली काढण्यात आलीय. 


10. वाळू लिलावाला विरोध केल्याने ग्रामस्थांच्या थोबाडीत भडकावली    

ग्रामसभेत वाळू लिलावाला विरोध केल्याच्या रागाने एका ग्रामस्थाला राहुरी कारखान्याचे माजी चेअरमन यांनी मारहाण केल्याने तालुक्यातील रामपूर येथील ग्रामसभेत मोठा गदारोळ झालाय. काल सकाळी  रामपूर मध्ये ग्रामसभा घेण्यात आली.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *