28 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - उद्यापासून बदलणार नियम, सामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भारत - पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे अमेरिकेकडून स्वागत
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे अमेरिकेने स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी जम्मू काश्मीर राज्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेवर अत्यंत काटेकोरपणे शस्त्रसंधी नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
2. उद्यापासून बदलणार नियम, सामान्यांच्या जीवनावर थेट होणार
सोमवारपासून अर्थात 1 मार्चपासून कोणत्या महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम थेट सामान्यांच्या जीवनावर होणार आहे.
3. परिणामजैश-उल-हिंदनं स्वीकारली मुंबईतील स्फोटकांच्या गाडीची जबाबदारी
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर दोनच दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. याची जबाबदारी जैश-उल-हिंदनं स्वीकारली आहे.
4. १५ वर्षे पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या पक्षानं भाजपची साथ सोडली
शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आणखी एका पक्षानं भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आहे. आसाममधील मित्रपक्षानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर.
5. युटय़ूबवर आता पालकांची सेन्सॉरशिप
ऑनलाईन शाळा सुरू असल्याने आता प्रत्येक मुलांच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात मुलांना टीव्हीऐवजी युटय़ूबवर व्हिडीओ पाहण्याची जास्त सवय लागलीय. तासन्तास स्मार्टफोन हातात घेऊन आपली मुलं युटय़ूबवर नेमकं काय पाहतायत हे पालकांना कळत नाही.
6. अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा खालावली
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. खुद्द बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे.
7. गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
गॅस, पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीविरोधात आज चूल मांडा आंदोलन करण्यात येणार आहे.
8. देशात गाढवांवर संक्रांत
गाढवाचे मांस खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो असा समज असल्याने देशातील काही भागांमध्ये गाढवाच्या मांसाला मोठी मागणी आहे.
9. टाईल्स व्यावसायिकाकडे सापडले 8 कोटींचे 'घबाड'
चेन्नई येथील एका टाईल्स आणि सेनेटरीवेअरच्या उद्योगातील एका कंपनीवर आय टी विभागाने छापा घातला. त्यात कंपनीत तब्बल ८ कोटी ३० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे.प्रत्यक्ष कर विभागाने तामिळनाडु, गुजरात आणि कोलकत्ता येथील ११ ठिकाणी छापे घातले तसेच ९ ठिकाणी सर्व्हे करण्यात आला.
10. कोंबड्यावर आहे मालकाच्या हत्येचा आरोप
तेलंगणामध्ये एका कोंबड्याला आपल्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकते. ही घटना राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील गोलापल्लीची आहे.
No comments
Post a Comment