Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - अहमदनगरमध्ये संजय राठोडांच्या फोटोला मारले जोडे

No comments

    News24सह्याद्री अहमदनगरमध्ये संजय राठोडांच्या फोटोला मारले जोडे...पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. अहमदनगर मध्ये संजय राठोडांच्या फोटोला मारले जोडे
पुजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.याचेच पडसाद नगर शहरात देखील पडलेले पाहायला मिळाले. आज मंत्री राठोड यांच्या फोटोला दिल्लीगेट चौकात जोडे मारत नगर शहर महिला भाजपने रस्तारोको केला. 

2. नगर महाविद्यालयाच्या एनएसएसच्या वतीने कोरोना व वाहतुक नियम जागृती
आज प्रत्येक नागरिकाने कोरोना व वाहतुक नियमावलीनुसार वर्तन करणे समाजहितासाठी आवश्यक आहे. हे नियम आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आहेत हे प्रत्येकाने जाणले पाहिजे, असे प्रतिपादन रजिस्ट्रार ए.वाय. बळीद यांनी केले. 

3. पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी
गेल्या महिनाभरापासून चोरांनी शहर परिसरामध्ये धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची चोरांना भीती नसल्यासारखेच ते वावरत आहेत. यासाठी पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आलीये . बालिकाश्रम रोड, धर्माधिकारी मळा व कल्याण रोड परिसरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 

4. शेतकऱ्यांनी कृषिपंपांची भरली ४४.७५ कोटींची थकबाकी
महावितरणकडून राबवण्यात येत असलेल्या महा कृषी ऊर्जा शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या थकबाकीत भरघोस सवलत देत थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४४ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. 

5. ५ हजार परप्रांतीय हाॅटेल कामगार पुन्हा परतीच्या मार्गावर
हॉटेल ‘हब’ म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या नगरमधील सुमारे पाच हजार परप्रांतीय हाॅटेल कामगार पुन्हा लाॅकडाऊन हाेण्याच्या भीतीने धास्तावले अाहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *