शहराची खबरबात - आयटी पार्कमधील कंपन्यांच्यवतीने युवकांना नेमणूक पत्र वितरण
News24सह्याद्री - आयटी पार्कमधील कंपन्यांच्यवतीने युवकांना नेमणूक पत्र वितरण....पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. आयटी पार्कमधील कंपन्यांच्यवतीने युवकांना नेमणूक पत्र वितरण
एमआयडीसीतील आयटी पार्कमधील कंपन्यांनी शहरातील आणखी काही युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.या कंपन्यांच्यावतीने या युवकांना नेमणूक पत्र देण्यात आले.जनतेच्या सहकार्यातून तसेच सकारात्मक दृष्टिकोनातून विविध क्षेत्रात चालू असलेल्या विकासकामांमुळे नगर शहरामध्ये उद्योजकांना व कामगारांना पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.
2. महामार्गांच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची?
नगर औरंगाबाद महामार्ग नगर शहरातून जातो शहरातील तपोवन रस्त्यापासून महापालिकेची हद्द सुरु होते तपोवन रस्त्यापासून ते वसंत टेकडी या भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले आहेत झाडाझुडुपांमध्ये मृत जनावरे टाकली जात आहे.
3. मीटरमध्ये फेरफार करून सात लाखांची चोरी
खोसपुरी शिवारातील हॉटेल व्यावसायिकांनी विजेच्या मीटरमध्ये फेरफार करून सात लाख रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हॉटेल चालक संदीप जरे व भारत शेटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4. गर्दी टाळण्यासाठी भरारी पथक तैनात
शहरातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महापालिकेने प्रभाग निहाय भरारी पथक स्थापन केला आहे नगर शहरात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढतो आहे कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत
5. तोकडी पगारवाढ कामगारांनी फेटाळली
अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्यावतीने कामगारांच्या पगार वाढीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ती कामगारांच्या वेतन वाढीचे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे सुरू असून विश्वस्त अत्यल्प पगारवाढ देत असल्याचा आरोप करून देऊ केलेली पगारवाढ कामगारांनी फेटाळली आहे.
No comments
Post a Comment