Breaking News

1/breakingnews/recent

21 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर तात्काळ हातपंप दुरुस्त....पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये 




TOP HEADLINES


1. कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
राहुरी तालुक्यातील तांभेरे रोडवरील माळवाडी परिसरातील शेतकरी बापूसाहेब लक्ष्मण हापसे  या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून कणगर शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.

2. जागेच्या मोजणीवरून मारहाण केल्याची घटना
तू ही जागा का खोदत आहेस. या जागेच्या मोजणीसाठी अर्ज केला असून मोजणी झाल्यानंतर तू खोदकाम कर.असे म्हणाल्याचा राग आल्याने बिरेंद्र चौबे यांच्या डोक्यात काठी मारून मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कात्रड येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी घडली. 

3. "मानवसेवेतून मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा!" - अण्णा हजारे
"गाव, समाज आणि देश यासाठी जगणारी आणि मरणारी माणसे खऱ्या अर्थाने जगतात. त्याचप्रमाणे मानवसेवेतून मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असतो!" असे विचार ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे गुरुवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित श्यामची आई कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. 

4. शेतीच्या बांधावरून दोन चूलत भावांमध्ये भांडण  
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे शेतीच्या बांधावरून दोन चूलत भावांमध्ये भांडण झाले. यावेळी प्रशांत गागरे या तरूणावर कुऱ्हाडीचा वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली आहे. 

5. प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर तात्काळ हातपंप दुरुस्त
 प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या सूचनेनंतर अनेक वर्षापासून बंद असलेला हातपंप तात्काळ दुरुस्त झाला. त्यामुळे शेवगाव शहरातील मसुबा नगर भागातील कुटुंबाचा तात्पुरता पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. 
 
6. कर्जतला मिळणार 50 एसटी बस
 कर्जत येथे आता एसटी बस डेपो होत असून कित्येक वर्षाचे कर्जतकरांचे स्वप्न कृतीत उतरवत आहे. पहिल्या टप्प्यात येथे पन्नास बसेस उपलब्ध होणार आहेत. 

7. पडेगाव च्या बहादुर गडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार
 छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा पडेगावचा बहादुरगड साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पडेगावी गमीनी कावा करत दोनशे अरबी घोडे आणि एक कोटीचा शाही खजिना मिळवला होता. हा परिसर पराक्रमी आणि स्वाभिमानी इतिहास सांगनारा आहे. 

8. ढोरजळगाव ला महावितरण विरोधात रास्ता रोको
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे शनिवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्युत महावितरण कंपनीने वडुले खुर्द, आव्हाने, ढोरजळगाव, निंबेनांदुर, वाघोली, गरडवाडी, गावातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद 

9. कोपरगावात शनिवारी पंधरा कोरोना बाधित रुग्ण
कोपरगावात नगर येथील अहवालात पाच, खाजगी दहा असे एकूण पंधरा रुग्ण शनिवारी कोरोना बाधित आढळले आहे. 34 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 

10. चांभूर्डी- धाडगेवाडी रस्त्याचे काम रखडले
श्रीगोंदा तालुक्यातील चांभूर्डी- धाडगेवाडी रस्त्याचे काम रखडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ यांना कसरत करावी लागत आहे. हा 2.900  किमीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक 2017-18 योजनेतून मंजूर झाला. या कामाची निविदा नगर येथील व्ही व्ही तलवे या ठेकेदाराला मिळाले. ठेकेदाराने दोन हजार एकोणावीस मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *