Breaking News

1/breakingnews/recent

21 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

     News24सह्याद्री - कर्नाटकात प्रवेशासाठी लागणार कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. इलेक्ट्रिक चारचाकी वाहन खरेदीवर सरकार देणार दीड लाखांचं अनुदान
देशाची राजधानी दिल्ली लवकरच प्रदूषणमुक्त होऊ शकते. कारण अलीकडेच दिल्ली सरकारने स्विच मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये विद्युत वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. 

2. भारत- चीन यांच्यात तब्बल 12 तास चर्चा
भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून बॉर्डरवरील तणाव कमी करण्याबाबत चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमधील सीमा वाद सोडवण्यासाठी शनिवारी दहाव्या फेरीतील सैन्य वार्ता  पार पडली. 

3. भारतीय जवानांसाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी बनवले खास तंबू
लडाखच्या भूमीवर जवळपास 12 हजार फुटाच्या उंचीवर आपले जवान रात्रंदिन देशाची सेवा करत असतात, पहारा देत असतात. या ठिकाणी रक्त गोठणारी थंडी असते. 

4. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन पुन्हा वादात

 उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी नुकतेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.


5. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यासारखी राज्य आघाडीवर आहेत. देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. 


6. कोरोना आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई
नागपुरात कोरोनाचा उद्रेक सतत सुरु आहे. नागपुरात पुन्हा एकदा कोरोनाचा  ब्लास्ट होऊन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहनच त्यांनी नागरिकांना केलं आहे. 

7. कर्नाटकात प्रवेशासाठी लागणार कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र

 महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कोगनोळी येथे महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराजय सीमा असणार्‍या टोलनाक्यावर तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली आहे.


8. महाराष्ट्राचे भाजप आमदार यांना राजस्थानमध्ये अटक
महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्ति कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. शांतीभंग केल्या प्रकरणी त्यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे व शांती भंग करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  


9. २४ फेब्रुवारीपासून बंद होतेय गुगलची  खास सेवा
सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा कमालीच्या लोकप्रिय आहेत. दरम्यान, या सेवांपैकी एक सेवा बंद करण्याचा निर्णय गुगलकडून घेण्यात आला आहे. 
 
10. अर्जुन तेंडुलकरवर बोली लावण्याचं जयवर्धनेनं सांगितलं कारण
 आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीच्या लिलावात मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यावर बोली लावली. 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर मुंबईने 21 वर्षांच्या अर्जुन तेंडुलकरला विकत घेतलं. आयपीएल लिलावामध्ये विकत घेतल्यानंतर अर्जुन तेंडुलकर याच्यावर घराणेशाहीचे आरोपही होत आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *