शहराची खबरबात - जिल्हा बँकेतील नगर तालुक्याचे महत्त्व घटले
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. अपघात रोखण्यासाठीही नियमांचे काटेकोर पालन आवश्यक - डॉ.सुनिल पोखरणा
कोविड काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्यांनी आरोग्य यंत्रणेला मोलाची साथ दिली आहे. महामारीप्रमाणेच आपण रस्ते अपघात रोखण्यासाठीही सतर्क राहिले पाहिजे. यासाठी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन प्रत्येकाने केले पाहिजे.
2. सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला पोलिसांचा अर्ज
नगर येथील रहिवासी सुमन काळे हिचा २००७ मध्ये पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळे सुमन काळे हिचा मृत्यू झाल्याचा आक्षेप तिच्या मुलाने घेतला होता. पोलीस तपासात विष पिल्यामुळे काळे हिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
3. ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास
ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीस एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अरुण रोकडे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
4. उच्च प्रतीच्या सेवेमुळे ‘साईदीप’अल्पावधीत नावारूपास
उच्च प्रतीच्या आरोग्य सेवा प्रामाणिकपणे उपलब्ध करून सामान्य रुग्ण यांना केंद्रबिंदू मानून अविरत सेवा उपलब्ध केल्यामुळे केवळ दोन वर्षात साईदीप हॉस्पिटल जिल्ह्यासह राज्यात नावारूपास आले,
5. जिल्हा बँकेतील नगर तालुक्याचे महत्त्व घटले
जिल्हा सहकारी बँकेला अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात वेगळे महत्त्व आहे. बँकेवर वर्णी लागावी यासाठी प्रत्येक राजकीय नेता प्रतिष्ठा पणाला लावत असतो. आजवर नगर तालुक्याचा चांगला दबदबा जिल्हा बँकेच्या राजकारणात होता.
No comments
Post a Comment