10 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - वडगाव मावळमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी जादूटोणा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. अकोल्यात शिवजयंती सप्ताहाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अकोल्यात शिवजयंती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे,अशी माहिती समितीचे अध्यक्ष अविनाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
२. पाथरीत रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा
श्री साईबाबांची जन्मभूमी असलेल्या पाथरीतील साई मंदिरामध्ये कोरोना नंतर मोठ्या प्रमाणात भक्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतू याठिकाणी अरुंद रस्ते, पार्किंगच्या जागेअभावी भक्तांना या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
३. इंदापूर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व
इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये 60 पैकी 38 ग्रामपंचायतीवर भाजपचेच निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले आहे.
४. शेलगावमधील ग्रामस्थांनी गाठले पा.बच्चू कडू यांचे कार्यालय
अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील शेलगावमधील शाळेजवळ असलेल्या पोल्ट्री फॉर्ममधून दुर्गंधी येत असून हा पोल्ट्री फॉर्म ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत आहे.
५. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अजूनही मदत नाही
कोरोना विषाणूच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोरोना योद्ध्यांना आपले प्राण गमवावे लागलेत.यावेळी मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून 50 लाख व महापालिकेकडून 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.
६. वडगाव मावळमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी जादूटोणा
पुण्याच्या वडगाव मावळमध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
७. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 227 धावांनी धुव्वा उडवला. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा चेन्नईचा एम.ए. चिदंबरम स्टेडिअमवर लाजीरवाणा पराभव झाला.

८. तरुणाला बुलेटवारी पडली महागात
हरयाणामधील गोहाना येथे बुलेट बाइकमध्ये बदल करुन तिच्या धुरांड्यातून मोठा आवाज काढणं अनेकांना चांगलच महागात पडत आहे. गोहाना-जिंद मार्गावरील मुलींच्या महाविद्यालयासमोर एका अशाच मुलावर पोलिसांनी कारवाई केली.
९. देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
भाजपाच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी त्यांना शरजील उस्मानी व सेलिब्रिटींच्या ट्विटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले,”शरजीलला अटक केलं जात नाही, पण त्याला अटक का केलं

१०. अवघ्या 21 वर्षांची मुलगी बसली सरपंचपदावर
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका बारकु आगिवले या तरुणीची निवड झाली आहे. सारिका ही अवघ्या 21 वर्षांची आहे.

No comments
Post a Comment