जिल्ह्याची खबरबात - वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात १२८.६१ कोटींची वाढ
News24सह्याद्री - वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात १२८.६१ कोटींची वाढ...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात १२८.६१ कोटींची वाढ
अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात आज तब्बल १२८.६१ कोटी रुपयांची वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जिल्ह्याच्या सर्वसाधारण आराखड्यासाठी ३८१.३९ कोटी रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती.
2. वनियुक्त सभापतींचा पदभार समारंभ संपन्न
कोपरगाव नगरपालिकेच्या विविध समितीच्या नवनियुक्त सभापतींचा पदभार समारंभ अमृत संजीवनी चे व्हाईस चेअरमन पराग संधान यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
3. कुसडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पै. बापुसाहेब दत्तात्रय कार्ले
जामखेड तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणार्या कुसडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पै. बापुसाहेब दत्तात्रय कार्ले तर उपसरपंच पदी नागेश कात्रजकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
4. शेकटे बुद्रुकच्या सरपंचपदी छाया गरड
शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीपैकी शेकटे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छाया साईनाथ गरड यांची तर उपसरपंचपदी ज्योती हरीचंद्र फाटे यांची गुप्त पद्धतीने मतदान घेऊन बहुमताने निवड झाली आहे.
5. माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन
श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार दौलतराव मल्हारराव पवार यांचे बुधवारी दुपारी दीड वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. पवार यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू होते.
6. पिंपरखेड ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात
जामखेड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंपरखेड ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी कांचन बापुराव ढवळे तर उपसरपंचपदी अविनाश अशोक गायकवाड यांची निवड झाली आहे.
7. दीड लाख रुपयांना विकली गेली एक शेळी
दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशींना लाखो रुपयांची किंमत येत असल्याची उदाहरणे आपण नेहमी ऐकतो. तर कधी ईदसाठी महत्वाचा म्हणून चंद्रकोर असलेल्या बोकडालाही लाखोंची मागणी येते. मात्र, या तुलनेत शेळ्याही कमी नाहीत.
8. तळेगाव नजीक संगमनेर - कोपरगाव रोडवर बर्निंग टेम्पोचा थरार
संगमनेर मधील तळेगाव जवळ संगमनेर कोपरगाव या रोडवर टॉवरसाठी डिझेल वाहतूक करणाऱ्या वाहनाने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली या आगीत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला.
No comments
Post a Comment