हे शरजीलचं सरकार आहे. त्याला संरक्षण देणारं सरकार आहे,; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
मुंबई -
देवेंद्र फडणवीस याने ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. शरजीलने केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. त्याचबरोबर सेलिब्रिटींच्या ट्विटबद्दल चौकशी करण्याची घोषणा आघाडी सरकारनं केली आहे. त्यावरून फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना शरजील उस्मानी व सेलिब्रिटींच्या ट्विटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले शरजीलला अटक केले जात नाही, पण त्याला अटक का केले नाही.
भाजपाच्या उत्तर भारतीय आघाडीने आंदोलन केले. त्या पदाधिकाऱ्यांना घरात जाऊन ताब्यात घेतले गेले. हेच सगळ्या मोठं आश्चर्य आहे. त्यामुळे हे शरजीलचे सरकार आहे. त्याला संरक्षण देणारं सरकार आहे, असे आम्ही म्हणालो तर चुकले काय? असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. सेलिब्रिटींचा प्रश्न आहे, तर ज्यांनी चौकशीची मागणी केली आणि ज्यांनी मागणी मंजूर केली त्या दोघांचंही मानसिक संतुलन बरोबर नाही. त्याची तपासणी झाली पाहिजे. चौकशी तर त्यांच्या मानसिक संतुलनाची व्हायला हवी. कारण भारताच्या सार्वभौमत्वाशी छेडछेड सहन केली जाणार नाही भारताच्या अखंडतेवर हल्ला होऊ देणार नाही असे म्हणने चुकीचे असेल तर आपल्या सगळ्यांना सरकारनं अटक करावे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

No comments
Post a Comment