Breaking News

1/breakingnews/recent

12 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

No comments

   News24सह्याद्री - पुणे : डेक्कन नदीपात्रात मगर, पोलिसांची धावपळ...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा





TOP HEADLINES

1. पुणे : डेक्कन नदीपात्रात मगर ?; पोलिसांची धावपळ

पुणे - डेक्कन नदीपात्रात मगर दिसल्याची खबर मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. मोठ्या संख्येने पोलीस व जवान दाखल झाल्याने बघ्यांची गर्दी ऊसळली होती.

2. स्वतंत्र महानगरपालिकेसाठी जोर; पूर्व हवेलीची विभाजनाकडे वाटचाल

थेऊर - हवेली तालुक्‍यातील वाघोली, थेऊर, उरुळी कांचन व कळस या चार मंडलाधिकारी कार्यालयातील तब्बल पन्नास महसूली गावांतील कार्यक्षेत्रासाठी अपर तहसीलदार म्हणून विजयकुमार चोबे यांची नियुक्ती विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या आदेशान्वये झाली आहे.

3. स्पर्धा परीक्षांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना वंचित ठेवता येणार नाही-सर्वोच्च न्यायालय

देशातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या लिहिण्यास सक्षम नसलेल्या उमेदवाराला स्पर्धा परीक्षा देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. 

4. एका हाताने टाळी वाजत नाही, छगन भुजबळ यांचा घणाघात

"गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झालंय. राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. 

5. एमजी लाँच करतंय 'ही' जबरदस्त कार!

एमजी मोटार इंडिया कंपनीने भारतीय बाजारात २०१९ मध्ये श्रीगणेशा केला होता. त्यानंतर एका पेक्षा एक भारी गाड्या एमजीने बाजारात आणल्या आहेत. कंपनी अजून एक कार लॉन्च करणार आहे, अशी मार्केटमध्ये चर्चा सुरु असताना एमजीने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

6. उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले

कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. 

7. जव्हार दौऱ्यात बंद दाराआड झाली चर्चा, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी मला काम करायचे आहे, ज्यामुळे इतके दिवस दुर्लक्षित असलेला जिल्हा हा प्रगतिपथावर येईल. याठिकाणी अनेक मूलभूत गोष्टींसाठी काम करण्याची गरज आहे. 

८. BBCला सर्वात मोठा धक्का;

बीबीसी वर्ल्ड या वृत्तवाहिनीला चीनमध्ये प्रसारण करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. ग्लोबल टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

9. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का!

कोलकाता हायकोर्टाकडून काल भाजपाला मोठा मिळाला. भाजपाकडून काढण्यात आलेल्या रथयात्रेवर स्थगिती आण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. रथयात्रा रोखण्यास न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे. ही एक राजकीय याचिका आहे, 

10. चीनने दोन दिवसात २०० पेक्षा जास्त रणगाडे घेतले मागे,

पूर्व लडाख सीमेवरील नऊ महिन्यांच्या तणावानंतर पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन भारत आणि चीनने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *