जिल्ह्याची खबरबात - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
News24सह्याद्री - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. सरपंच पदाची निवडच झाली नसल्याने सरपंच पद रिक्त
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील तीळवणी ग्रामपंचायत निवडणूकीत काळे गटाला ७ जागा तर कोल्हे गटाला एकही जागा मिळवता आली नाही.
2. विंचरणा नदीच्या बाजुची अतिक्रमणे हटवली
नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शंकराची मुर्ती बनवण्याचे काम सुरू केले होते. त्याच अनुषंगाने रात्री ही शंकराची मुर्ती जामखेड शहरात दाखल झाली.
3. आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण समारंभ मंगळवारी
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण समारंभ मंगळवारी १६ फेब्रुवारी ला नगरच्या माउली सभागृहात आयोजित करण्यात आलाय.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण समारंभ मंगळवारी १६ फेब्रुवारी ला नगरच्या माउली सभागृहात आयोजित करण्यात आलाय.
4. मुख्य रस्त्यांसह हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी निधीची मागणी
कोपरगाव शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून कोपरगाव शहराची मोठ्या प्रमाणात हद्दवाढ होवून विकासाचे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असून या ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना रस्ते,पाणीपुरवठा, भूमिगत गटारी आदी मुलभूत सुविधा मिळत नाही.

5. अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी महसूल विभागाची कारवाई
शेवगाव तालुक्यातील गौणखनिजाची वाहतूक व अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील दहिगाव ने येथील जेसीबी, दोन ट्रॅक्टर, आखेगाव वरुर येथील प्रत्येकी एक ट्रॅक्टर पकडून 12 लाख 50 हजाराचा दंड केला आहे.

6. रस्ते सुरक्षाविषयी विद्यार्थाद्वारे जनजागृती
३२ व्या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रमांतर्गत पारनेर शहर तसेच नगर पुणे महामार्गावर विविध प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येऊन अपघाताविषयी जनजागृती करण्यात आली.
7. कोपरगाव तालुक्यातील आजी-माजी सैनिकांची आढावा बैठक
कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिकांचे समस्या निवारण्यास प्रशासन सदैव प्रयत्नशील राहिल.असे आश्वासन तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिले अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विजय सप्तपदी आणि महाराजस्व अभियान अहमदनगर जिल्ह्यात सुरु आहे.
8. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने संगमनेर ते लोणी रस्त्यावर वडगावपान शिवारात विना परवाना वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला आहे.याप्रकरणी डंपरचालक व मालकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

9. संगमनेर मध्ये सरपंचाची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री
हल्लीच्या काळात राजकारण्यांकडून निवडणुकीपासून ते शपथविधी अशा प्रत्येक सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन केले जाते. असाच एक सोहळा संगमनेर तालुक्यात पार पडला. तालुक्यातील आंबा दुमाला गावच्या सरपंचांनी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेत पदाचा कार्यभार स्वीकारला.

10. ऊसाला आग लागल्याने मोठे नुकसान
संगमनेर तालुक्याच्या अकलापूर अंतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथील एका उसाच्या शेतात आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये ऊसाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतावरून गेलेल्या वीजवाहक तारा मध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगी मुळे आग लागल्याची घटना घडली
No comments
Post a Comment