मोठी बातमी - पहा कोणते पक्षी आणि कुठे मृत पावले
News24सह्याद्री -
श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथे पाच मोरांच्या मृत्यूची बातमी हाती आली आहे कोकणगाव परिसरात मोरांची मोठी संख्या आहे मात्र हे मोर मानवी वस्तीत दिसू लागले आहे. या कारणामुळे मोरांची शिकारही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. कोकण गाव भागात आढळले हे पाच मोर नेमकं कश्या मुळे मृत्युमुखी पडले. याबाबत आणखीन तरी वनविभागाच्या हाती पुरावा लागलेला नाही. मात्र ,बर्ड फ्ल्यू असावा कि अन्य कारणाने हे पाच मोर मृत झाले आहेत याचा शोध आता वनविभाग घेत आहे. वन विभागाचे पथक कोकणगाव येथे पोहोचल त्यांनी मृत मोरांचे अवशेष ताब्यात घेतले आहेत, त्यांचा तपास झाल्यावरच मोर का मृत्युमुखी पडलेत हे कळेल.
No comments
Post a Comment