मोठी बातमी - पारनेरच्या किन्ही गावामध्ये बिबट्या पडला कोरड्या विहिरीत
News24सह्याद्री -
नगर जिल्ह्यात बिबट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मागील दोन महिन्यापूर्वी पाथर्डी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यात तीन बालकांचा मृत्यू झाला होता तर, काही शेतकरी गंभीर जखमी झाले होते. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात ३ बिबटे अडकले होते. मात्र आता पारनेर तालुक्यातही बिबटयाचा वावर वाढला असून अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पारनेर तालुक्यातील किन्ही येथे धोंडिभाऊ खोडदे यांच्या विहरीत बिबट्या पडल्याची माहिती हाती येत आहे. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे अधिकारी किन्ही येथे पोहचले असून विहरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न वन विभागाच्या टीमने सुरु केले आहेत. पाण्याच्या आणि भक्ष्याच्या शोधात बिबटे गावामधे येत असल्याने नागरिकांवर सुद्धा हल्ला करून बिबटे पसार होत आहेत. वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणे पारनेर तालुक्यातील ग्रामस्थ करत आहेत
Tags:
No comments
Post a Comment