Breaking News

6/breakingnews/random

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाने मी प्रभावित झालो; रितेशचे ट्विट चर्चेत

No comments


मुंबई -

रितेश देशमुख म्हणाले की काल देशाने राज्यसभेत काल वेगळेच दृश्य बघितले. विविध मुद्द्यांवरून जिथे सभापतींच्या हौद्यापर्यंत पोहोचून गोंधळ घातला जात असल्याचे चित्र असते, तिथे भावनिक वातावरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर सभागृह स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधानांच्या भाषणातून गुलाम नबी आझाद यांच्यातील हळवा माणूस सभागृहाने पाहिला. पंतप्रधान मोदींनाही अश्रू अनावर झाले आहे. मोदींच्या या भाषणानंतर त्या दुःखद प्रसंगाबद्दलची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने केलेले ट्विट चर्चेत आले आहे. रितेश देशमुखने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावुक होण्यावर ट्विट केले आहे. ‘गुलाम नबी आझाद साहेब राज्यसभेतून निवृत्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाने मी प्रभावित झालो आहे’ या आशयाचे ट्विट रितेशने केले. 

जुलै २००७ मध्ये गुजरातमधून काही पर्यटक काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. श्रीनगर जवळ असताना यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात्रेकरूंची बस मुघल गार्डनच्या दिशेने जात असताना हा हल्ला झाला होता. यात जवळपास ८ जण जागीच मरण पावले होते. तर काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हा हल्ला झाला त्यावेळी गुलाम नबी आझाद जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. या घटनेनंतरचा एक ह्रदयद्रावक व्हिडीओ असून, त्यात जखमींना मदतीसाठी धावणारे आणि त्यांचे सात्वंन करताना आझाद दिसत आहे. जखमींचे मृतदेह आणि नातेवाईकांना हवाई दलाच्या विमानात टाकल्यानंतर आझादांनी माफी मागितली. फुले-फळे देऊन परत पाठवणार होतो, पण मुलांचे मृतदेह आम्हाला माफ करा असे म्हणत आझादांनी जोडले हात जोडले. हे म्हणत असताना त्यांचा कंठही भरून आला होता.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *