गॉसिप कल्ला - अभिनेत्री दीपा परब-चौधरीचे छोट्या पडद्यावर कमबॅक
News24सह्याद्री - अभिनेत्री दीपा परब-चौधरीचे छोट्या पडद्यावर कमबॅक.. पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
१. ‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी प्रभास चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2018 मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
२. आमिर खानच्या मुलीची सोशल मीडियावर चर्चा
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते. इराने प्रामिस डे निमित्त नुपूरसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
३. आलिया भटच्या मेंहदीचा फोटो आला समोर
सध्या बॉलिवूड अभिनेत्री आलियाचा वधूच्या गेटअपमधला फोटो सोशल मीडियावर फोटो समोर आला आहे. या फोटोवरुन रणबीर आणि आलियाने गुपचूप लग्न केलं का असा प्रश्न विचारला जातोय.
४. अभिनेत्री दीपा परब-चौधरीचे छोट्या पडद्यावर कमबॅक
मराठी अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दिपा परब-चौधरी ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दीपा छोट्या पडद्यावर कमबॅक करनार आहे. शेवटची ती 'अंड्या चा फंडा' चित्रपटात दिसली होती.
५. सनी लिओनीच्या शुटिंग सेटवर जबरदस्ती पोहोचले गुंड
विक्रम भट यांची आगामी वेबसीरीज 'अनामिका' च्या सेटवर जोरदार राडा झाला आहे. या वेब सीरिजमध्ये सनी लिओनी मुख्य भूमिकेत आहे.
No comments
Post a Comment