Breaking News

1/breakingnews/recent

राणेंच्या धमकीनंतर शिवसैनिक थेट रस्त्यावर उतरले, कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकाकडे मागणी

No comments



मुंबई -

सिंधुदुर्ग मधील राजकीय वातावरण धमकी नंतर चांगलच चिघळले आहे.  निलेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांनी धमकी दिल्यापासून सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेआहे. राणेंच्या धमकीनंतर शिवसैनिक थेट रस्त्यावर उतरले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर आणि जिल्हाभरातील कार्यकर्ते एकवटले आहे. निलेश राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला आहे. निलेश राणेंवर निवेदनाद्वार कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली आहे. निलेश राणेंच्या अशा सततच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली तर निलेश राणे जबाबदार राहणार असल्याचंही या नेत्यांनी म्हटले. 

या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी, असे निलेश राणे म्हणाले. विनायक राऊत ही खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना किती मतं पडतात, हे पाहूच. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमतही नाही. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करुन राऊतांना कोकणातून हद्दपार करू, अशी गर्जना निलेश राणे यांनी केली.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *