12 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - युवा शेतकर्याने केली काळ्या गव्हाची लागवड...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. आवळगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच पदांची बहुमताने निवड
सरपंच व उपसरपंच पदावर विराजमान झालेले दोन्ही व्यक्ती अत्यंत साधे सरळ व मनमिळावू असल्यामुळे गावातील जनतेनी त्यांचे खूप खूप अभिनंदन केले.
2. भूमकाल विद्रोहाचे नायक शहीद वीर योध्दा गुंडाधुर शहादत दिवस साजरा
पारंपरिक ईलाका गोटूल समिती भामरागड तथा ईलाका ग्रामसभांचे विद्यमाने भूमकाल दिवस मौजा नेलगुंडा येथे साजरा करण्यात आले आपले अस्तित्व,अस्मिता,आत्मसन्मान,आप ले अधिकार करिता शहीद वीर योध्दा गुंडाधुर यांचे भूमकाल दिवसाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील सर्व जनता एकत्र येऊन आनंदाने मांजरी ढोल,भोगाम ढोल,हकुमि,रेला नृत्य सादरीकरण केले
3. युवा शेतकर्याने केली काळ्या गव्हाची लागवड.
तालुक्यातील आकोलखेड येथील सुहास आप्पा तेल्हारकर या युवा शेतकर्याने आपल्या दीड एकर शेतात काळ्या गव्हाची लागवड केली आहे.काळ्या गव्हाची लागवड राजस्थान, पंजाब,हरियाणा, हिमाचल प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे.
4. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा
जेजुरी देवस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नियोजित आहे.
5. पंढरपूर-सांगोला रस्त्यावर कासेगावजवळ भीषण अपघात
पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीला ट्रकने धडक दिल्यानं भीषण अपघात झाला.
6. सरकारची नवी योजना
देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्डबद्दल संपूर्ण माहिती आहे आणि हे कार्ड सरकारी तसेच इतर सेवांशी देखील जोडले जात आहे. अलीकडेच रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मसुदा तयार केला आहे,
7. पुणे : नदी सुधारणेचे पुन:श्च हरिओम
मुळा-मुठा नद्यांचे संवर्धन करण्यासाठी जपान मधील जायका कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मुठा- मुठा नदी संवर्धन योजनेच्या निविदांचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठीच्या अंदाजित प्रकल्प खर्चास महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीत गुरूवारी मान्यता देण्यात आली
8. जमिनीच्या वादातून सख्ख्या भावासह जावयाची हत्या
शेतजमिनीच्या वादातून अनेक नाती दुभंगली जातात. अनेकदा तर वाद विकोपाला जाऊन जीव देखील जातात. लातूर जिल्ह्यातील हेर येथे अशीच घटना घडली आहे.
9. "शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा भाजपच्या नेत्याचा इशारा
दरवर्षी 19 फेब्रुवारीला देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पण, यंदा मात्र शिवजयंतीवर कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सावट असणार आहे.
10. ग्रामसभांना पुन्हा राज्य सरकारची संमती- हसन मुश्रीफ
अंतर, मास्क नियम आणि कोरोनाच्या संदर्भात जारी केलेल्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास पुन्हा परवानगी आल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.
No comments
Post a Comment