गॉसिप कल्ला - रणवीर सिंगचा चित्रपट ’83’ 4 जूनला प्रदर्शित होणार
News24सह्याद्री - रणवीर सिंगचा चित्रपट ’83’ 4 जूनला प्रदर्शित होणार... पहा गॉसिप कल्ला मध्ये
1. रणवीर सिंगचा चित्रपट ’83’ 4 जूनला प्रदर्शित होणार
रणवीर कपूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रणवीर सिंगचा चित्रपट ’83’ यंदा 4 जूनला प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंगने सोशल मीडियावर याची माहिती देत चाहत्यांना खूश केल आहे. 83 चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. हा चित्रपट क्रिकेटर कपिलदेवचा बायोपिक असून 1983 च्या वर्ल्ड कपवर याची कहाणी आधारित आहे.
2. सोनू सूद घेणार ४ मुलींना दत्तक
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. तो कधी गरिबांना मदत करतो तर कधी यूजर्सला भन्नाट रिप्लाय देताना दिसतो. आता सोनू सूदने उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील लोकांना मदतीचा हात दिला आहे. उत्तराखंडमध्ये नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्याने प्रलयामध्ये टिहरी जिल्ह्यातील आलम सिंग पुंडरी यांचा मृत्यु झाला होता.
3. प्रिया बापटने तिच्या टीमसोबत केली 'पावरी'
सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी इंस्टा स्टार दानानीरचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर बॉलिवूडसोबत मराठी सेलिब्रेटीदेखील खूप रिएक्शन देत आहेत. आता प्रिया बापटने एका फोटोशूट दरम्यान तिच्या टीमसोबत पावरी व्हिडीओ बनवला आहे.
4. मानसी नाईकने दिली चाहत्यांना गुड न्यूज
मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. नुकताच मानसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने त्या दोघांचा म्युझिक अल्बम भेटीला येत असल्याचे सांगितलय. मानसी नाईक हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर टीझर शेअर करत तिचा आणि प्रदीपचा नवीन म्युझिक अल्बम येत असल्याचे चाहत्यांना सांगितल आहे.
5. दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी शेअर केली झुंडच्या प्रदर्शनाची तारीख
सैराट, फँड्री असे ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. विषयातलं वेगळेपण आणि मांडणीतली कल्पकता यामुळं त्याचे चित्रपट सर्वच वयोगटातल्या लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. नागराजचा ‘झुंड’ हा चित्रपट येत्या १८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळेनं आपल्या सोशल मिडीया हँडलवरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
6. युझरच्या प्रश्नावर सुश्मिता सेनच्या मुलीचं हटके उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची मुलगी रिनीनं अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच रिनीनं चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर Ask Me सेशन घेतलं होतं. ज्यात तिला तिच्या खऱ्या आईपासून ते रिलेशनशिप स्टेटसपर्यंत अनेक प्रश्न विचारले गेले आणि रिनीनं सुद्धा या प्रश्नांची अगदी बिनधास्त उत्तरं दिली.
No comments
Post a Comment