सह्याद्री Breaking - तूर्तास राजीनामा द्या लवकरच निर्णय घेऊ मुख्यमंत्री
News24सह्याद्री -
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते.
त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.वनमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक संपली आणि . त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
No comments
Post a Comment